Police on alert mode after Jalgaon sbi robbery incident jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : जळगावच्या घटनेनंतर पोलिस ‘अलर्ट मोड’वर! ...असा घालता येईल गुन्ह्यांना आळा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील उपविभागातील बँकेच्या परिसरात दरोडे, जबरीचोरी, घरफोडी, अशा गुन्ह्यांना चाप बसावा, या अनुषंगाने येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात बँक अधिकाऱ्यांची मंगळवारी (ता.६) सकाळी साडेअकराला बैठक घेण्यात आली. (Police on alert mode after Jalgaon sbi robbery incident jalgaon news)

या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी बँक अधिकाऱ्यांना सूचना व मार्गदर्शन केले. तसेच बँक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासह विविध उपाययोजना सूचविण्यात आल्या.

जळगाव स्टेट बँक व कोल्हापूर ज्वलर्स सराफ दुकानावर भरदिवसा दरोडा टाकल्याच्या घटना काही दिवसांपूर्वी घडल्या. त्या पाश्वभूमीवर भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी मंगळवार (ता. ६) उपविभागीय अधिकारी कार्यालयात सकाळी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

या वेळी मार्गदर्शन करताना पिंगळे यांनी सर्व बँक अधिकाऱ्यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नसल्यास तत्काळ बसवून घ्यावेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसवताना बँकेच्या अंतर्भागासोबतचा बाह्य भागही कव्हर होईल, याची दक्षता घ्यावी. सीसीटीव्हीचा बॅकअप किमान एक महिन्याच्या असावा.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्या दृष्टीने हार्ड डिस्कचे नियोजन करावे. बँकेच्या परिसरात सशस्त्र सुरक्षारक्षक नियुक्त करावेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कंत्राटी कर्मचारी यांची नियुक्ती बँकेत करू नये. मौल्यवान वस्तू व रोख रक्कम ठेवायची तिजोरी मजबूत असावी. त्या दृष्टीने नियोजन करावे. बँकेसमोरील संरक्षणभिंत तसेच बँकेच्या भिंती मजबूत असाव्यात.

एटीएममध्ये चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे असावेत. रात्रीच्या वेळी कुणीही बँकेत प्रवेश करू नये, यासाठी वार्निंग बेल बसवाव्यात. बँकेत गणवेशधारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना अंतर्गत भागात प्रवेश द्यावा.

बँकेत अगर बँक परिसरात संशयास्पद व्यक्ती आढळल्यास स्थानिक पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा. बनावट नोटासंदर्भात माहिती मिळाल्यास त्या संदर्भात पोलिसांना कळवावे, अशा सूचना व मार्गदर्शन उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या.

...असा घालता येईल गुन्ह्यांना आळा

बँक अधिकाऱ्यांनी दररोज आपल्या हद्दीतील पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांच्या संपर्कात राहणे तसेच त्यांचे मोबाईल क्रमांक जवळ बाळगणे गरजेचे आहे. पंधरा दिवसातून एकदा तरी पोलिस अधिकाऱ्यांना बँकेत व्हिजिटसाठी अवश्य बोलवा. बँकेत जर एखादा दमदाटी करीत असेल तर तत्काळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.

सर्व बँक अधिकाऱ्यांनी व्हॉट्सॲप ग्रुप बनवून दैनंदिन सूचना त्याद्वारे एकमेकांना शेअर करा. तसेच पेन्शनधारकांसाठी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काही पोलिस कर्मचारी बँकेच्या सभोवताली गस्त करतील, जेणे करून चोरीचे प्रमाण कमी होईल.

तसेच ज्या बँकांमध्ये आरएफआयडी प्रणाली लावलेली नसेल त्यांनी लावल्यास पोलिस कर्मचारी रात्रभरातून चार वेळा त्याठिकाणी व्हिजिट देतात व सकाळी तो रिपोर्ट तपासला जातो. बँक अधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळेस सुरक्षारक्षक ठेवणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टी अंमलात आणल्या तर दरोडे, चोरी सारख्या गुन्ह्यांना आळा बसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT