Suspects detained at gambling den.  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 13 संशयितांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील हरिविठ्ठलनगरातील मारुती मंदिराजवळील परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस उपअधीक्षकांचे पथक आणि रामानंद पोलिसांनी रविवारी (ता. २५) छापा टाकून मोबाईल व रोकडसह जुगार खेळण्याचे साहित्य, असा एकूण ३२ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. (Police raid gambling den case registered against 13 suspects jalgaon crime news)

हरिविठ्ठलनगरातील कीर्ती हार्डवेअरच्या बाजूला जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप गावित यांना मिळाली. त्यावरून त्यांच्या पथकासह रामानंदनगर पोलिसांनी रविवारी दुपारी अडीचला जुगार अड्ड्यावर छापा टाकला. जुगार खेळणाऱ्या १३ जणांवर कारवाई केली. पोलिसांनी १० मोबाईल व रोकड, असा ३२ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

ही कारवाई पोलिस नाईक सचिन साळुंखे, राहुल पाटील, अशोक फुसे यांच्यासह रामानंदनगर ठाण्याचे पोलिस नाईक संजय सपकाळे, सुशील चौधरी, राजेश चव्हाण, सागर देवरे यांनी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याबाबत पोलिस कर्मचारी सचिन साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित रोहित श्रीराम बारी (वय २८), दिलीप रामचंद्र कोळी (४०), राजू राघव बारी (५७), मोतीलाल महादू कुमावत (७७), धर्मराज ऊर्फ गोपाल भागवत धनगर (३४), विनोद शांताराम पाटील (४२), धनराज दिलीप धनगर (२८), भय्या रामदास पाटील (३९), गजानन देवराम बारी (२८), प्रभाकर पुंडलिक बारी (४९), ईश्वर दशरथ महाजन (४६), बापू श्‍यामराव पाटील (४०) आणि कैलास दत्तू महाजन (४५, सर्व रा. हरिविठ्ठलनगर) यांच्याविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raosaheb Danve: महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची चर्चा अन् रावसाहेब दानवेंची दिल्लीत धावपळ...नेमकं काय सुरू आहे?

Latest Marathi News Updates : नवाब मलिकांंना पराभूत केल्यानंतर 'सपा'चे आमदार अबू आझमी देवगिरीवर अजित पवारांच्या भेटीला

Eknath Shinde: ठाणे जिल्ह्याला हवा फुलटाइम ‘ठाणेदार’; कोणाला मिळणार संधी?

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 'ट्रॅव्हल्स'च्या दरातच आता चक्क विमानप्रवास; 'या' कंपनीकडून संभाव्य दर प्रसिद्ध

मी पूर्ण प्रयत्न केले, तरी तू जाण्याचा निर्णय घेतलास...! Rishabh Pant ने दिल्लीची साथ सोडल्यानंतर मालक पार्थ जिंदाल स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT