जळगाव : मेहरूणच्या अशोक किराणा परिसरात सुरू असलेल्या सट्टा व जुगाराच्या अड्ड्यावर एमआयडीसी पोलिसांनी धाड टाकून जुगाराच्या साहित्यासह रोकड हस्तगत केली आहे. या अड्ड्यावर पोलिस पथकाने ११ जुगारी-सटोड्यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील मेहरूण परिसरातील अशोक किराणा चौकात सट्टा व जुगाराचा अड्डा चालवला जात असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली हेाती. प्राप्त माहिती नुसार, त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, सचिन पाटील, चेतन सोनवणे, चंद्रकांत पाटील, छगन तायडे यांच्या पथकाने रात्री अशोक किराणा चौकातील जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी जुगार खेळण्याचे साहित्य, ६ हजार ३०० रूपयांची रोकड असा एकुण ऐजव हस्तगत केला.
या कारवाईत सिराज सैय्यद शेख सलीम (वय-४९ रा. शेरा चौक, मास्टर कॉलनी), शेख जावेद शेख सलीम (वय-२८ रा. अशोक किराणा चौक), अरूण सुपडू भदाणे (वय-५० रा. मेहरूण), विजय रामभाऊ सोनवणे (वय-६०रा. राम नगर), पंकज अरूण महाजन (वय-२३रा. अयोध्या नगर), सुपडू चावदास सपकाळे (व-४२रा. सुनसगाव), अजय ज्ञानेश्वर कोळी (वय-३५ रा. मोहाडी), मजीद शेख बाबू शेख (वय-४६ रा. रामेश्वर कॉलनी), कडू राजाराम परखड (वय-५९रा. रामेश्वर कॉलनी), जगदीश श्याम पाटील (वय-३६रा. मेहरूण) आणि लियाकत अली अजगर अली (वय-५३ रा. लक्ष्मी नगर) अशा अकरा जुगारी-सटोड्यांना ताब्यात घेतले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोलिस नाईक छगन तायडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस कर्मचारी करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.