Jalgaon Crime : येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत मालेगाव रस्त्यावर विनापरवाना विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी छापे टाकून सुमारे २० हजार ७९८ रूपयांची दारू जप्त केली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. एकाच दिवसात पोलिसांनी पाच ठिकाणी कारवाई केली.
मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विष्णू आव्हाड व उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे श्री. आव्हाड यांनी सहकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले.
त्यानंतर पोलिसांनी सोमवारी (ता.१४) सायंकाळी ठिकठिकाणी छापे टाकून विनापरवाना देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्यांना पकडून त्यांच्याकडून दारू जप्त केली. (Police seized liquor worth around 20000 jalgaon crime )
त्यात मालेगाव रस्त्यावरील हॉटेल मानस गार्डनच्या मागील बाजूस एकाच्या ताब्यातून १ हजार ३६६ रूपयांची ब्ल्यू कंपनीची दारू, आडगाव शिवारातील हॉटेल साई कृष्णाच्या मागील बाजूस छापा टाकून २ हजार ४५७ रूपयांची टँगो पंच व किंग फिशर कंपनीची दारू, तसेच पिलखोड शिवारातील हॉटेल पुष्पराजचे मागील बाजूस छापा टाकून २ हजार ३२० रूपये किमतीची रॉयल स्टॅग, ब्लॅक व्हिस्की, व्हाईट मिसचिफ, इम्पोरियल ब्ल्यू या कंपन्यांची दारू जप्त केली.
आडगाव शिवारातीलच फौजी ढाबाच्या मागील बाजूस पोलिसांनी छापा टाकून ७ हजार ३५५ रूपये किमतीचा इम्पोरियल ब्ल्यू, रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज, स्टँअलिंग रिझर्व्ह, ब्लॅक व्हिस्की, मॅजिक मूव्हमेंट, मॅकडॉल्ड, किंग फिशर, ओसो ब्ल्यू व टुबर्ग कंपनीच्या देशीविदेशी दारूचा साठा जप्त केला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तसेच पिलखोड शिवारातील हॉटेल रणांगणाच्या मागील बाजूस विनापरवाना दारू बाळगून चोरटी विक्री करताना एकजण आढळून आला. त्याच्या ताब्यातूनही ७ हजार ३०० रूपये किमतीची मॅकडाल्ड, देशी, रॉयल चॅलेंज, व्हाइट मिसचिफ, गोवा जीन, सिमरन ऑफ, ट्यूबर्ग बिअर, किंगफिशर बिअर ही दारू जप्त केली. चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावरील भागात कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलिस कर्मचारी अरुण पाटील, नितीन सोनवणे, भूषण बाविस्कर, सुदर्शन घुले यांनी केली. या प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहाय्यक निरीक्षक विष्णू आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. ग्रामीण भागात सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड यांनी केलेल्या कारवाईचे महिलावर्गाकडून स्वागत केले जात असून, या कारवाया अशा सुरू ठेवाव्यात, अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.