रावेर : विधानसभा निवडणुकीत रावेरमध्ये हरिभाऊ जावळे व मुक्ताईनगरमधून श्री. खडसेंचा पराभव जात आणि पैशांमुळे झाला नाही, तर भारतीय जनता पक्षाच्या केंद्र व राज्य सरकारने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोचली नाहीत, म्हणून झाला, असे प्रतिपादन ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके यांनी येथे केले.
आवश्य वाचा- भयंकर दुर्घटना: माॅर्निंग वाॅकला दोघी निघाल्या आणि अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच ठार झाल्या
येथील बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यातून धडा घेऊन पुढे केंद्र सरकारची कामे जनतेपर्यंत प्रभावीपणे पोचविण्याचे आवाहन त्यांनी केले. भारतीय जनता पक्षात श्रेयवाद केला म्हणून पक्ष सोडावा लागला, असे नमूद करत डॉ. राजेंद्र फडके यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर त्यांचे नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले.
भाजपच्या विचारांच्या नवीन सरपंचाच्या गळ्यात वेगळ्या पक्षाचे रुमाल टाकण्याचे काम काही लोक करतात, पण यामुळे पक्षाला काहीही फरक पडला नाही. उलट पक्षाचा विस्तार होत असल्याचे डॉ. फडके यांनी सांगितले. पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अजय भोळे, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, जिल्हा सरचिटणीस डॉ. विजय धांडे यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, शेतकरी आघाडीचे नाशिक विभागीय संघटक सुरेश धनके, जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन, कैलास सरोदे, नंदा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, अमोल पाटील, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र लासूरकर, शिवाजीराव पाटील, माजी सभापती जितेंद्र पाटील, माजी उपसभापती सुनील पाटील, महेश चौधरी, पंचायत समितीच्या सदस्या कविता कोळी, नगरसेवक यशवंत दलाल, महेश पाटील, गोपाळ नेमाडे, प्रल्हाद पाटील, प्रा. सी. एस. पाटील, रेखा बोंडे, नितीन पाटील आदी उपस्थित होते.
मेरा बूथ-सबसे मजबूत
पक्षाच्या १२ मंडलांत बूथ महासंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्यात ९७ हजार बूथमधील प्रत्येकी ३० अशा सुमारे ३० लाख कार्यकर्त्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न अभियानातून होणार आहे. त्यासाठी ‘मेरा बूथ-सबसे मजबूत’, ‘बूथ जितो-देश जितो’ हे उद्दिष्ट ठेवले आहे. जळगावसह नगर आणि नाशिक जिल्ह्यातील बूथप्रमुख प्रभारी म्हणून डॉ. फडके आणि श्री. कांडेलकर यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.