A table showing the level of pollution. 
जळगाव

Diwali Pollution: लक्ष्मीपूजनाला फटाक्यांमुळे प्रदूषणाची पातळी 212 टक्के; नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

सकाळ वृत्तसेवा

Diwali Pollution : शहरात काल (ता.१२) फटाक्यांमुळे प्रदूषणाची पातळी (‘एक्यूआय’-एअर क्वालिटी इंडेक्स) २१२ टक्क्यांपर्यंत वाढली होती. रविवारी (ता.१२) रात्री आठ ते मध्यरात्री व पुढे सोमवारी सकाळी अकरापर्यंत १७४ ते २१२ टक्क्यांदरम्यान प्रदूषणाची पातळी पोचली आहे. हवेत फटाक्यांच्या धुरामुळे प्रदुषण झाले आहे. रविवारी लक्ष्मीपूजनाचा दिवस होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणात फटाक्यांचे प्रदूषण वाढले.

फटाक्यांमुळे प्रदूषण होते. ते टाळण्यासाठी प्रदुषण नियंत्रण महामंडळाने शहरातील चार केंद्रावर प्रदूषण मोजणी केंद्र सुरू केली होती. त्यात प्रभात कालनीतील केंद्रावर नोंदविला गेलेल्या प्रदूषणाची माहिती उपलब्ध झाली आहे.

(Pollution level 212 percent due to firecrackers on Lakshmi Puja in jalgaon news)

जे नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक होतेच होते. शहरासह जिल्ह्यात रविवारी (ता.१२) दिवाळीच्या सणानिमित्त नागरिकांची विविध प्रकारच्या फटाक्यांची आतीषबाजी केली. त्यात अनेक विषारी पदार्थ हवेत सोडले गेले आहे.

काल ओझोनचे प्रमाण ५८ टक्के, सीओचे ७, एनओ२ चे ५६ (विषारी), पीएम १०-चे २०७, पीएम २.५ चे प्रमाणे १७४ टक्के होता. सर्वसाधारणपणे पीएम ११० पातळी १०० मायक्रोग्राम घनमीटर असते. तर पीएमस २.५ ची सामान्य पातळी ६० मायक्रोग्राम घनमीटर. यापेक्षा जास्त असल्यास ते हानीकारक ठरते.

‘एक्यूआय’असा मोजला जातो

‘एक्यूआय’ ०-५० च्या दरम्यान म्हणजे हवा स्वच्छ आहे

५१-१००- च्या दरम्यान म्हणजे हवेची शुद्धता समाधानकारक आहे

१०१-२००- 'मध्यम' दरम्यान

२०१-३००- दरम्यान वाईट

३०१-४०० - दरम्यान जास्त वाईट

४०१-५००- दरम्यान गंभीर श्रेणी

देशात प्रदूषणाचे हे घटक आहे

‘एक्यूआय’ला ८ प्रदूषण घटकांच्या आधारे निश्चित केलं आहे. यात पीएम१०, पीएम २.५, एनओ२, एसओ२, सीओ२, ओ३ आणि एनएच३, पीबी आहेत. २४ तासांत या घटकांचे प्रमाण हवेची गुणवत्ता ठरवते.

एसओ-२ : म्हणजे सल्फर ऑक्साईड, तो कोळसा आणि तेल जाळल्याने उत्सर्जित होतो.

सीओ- २ : म्हणजेच कार्बन ऑक्साईड रंगीत असतो, त्याला गंध असून तो विषारी असतो. कोळसा किंवा लाकूड यांसारख्या इंधनाच्या अपूर्ण जळण्याने हा वायू तयार होतो. वाहनांचे उत्सर्जन हे कार्बन ऑक्साईडचे प्रमुख स्त्रोत आहे.

एनओ- २ : म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड, जो उच्च तापमानातील ज्वलनातून तयार होतो. हे खालच्या हवेत धुकं किंवा वर एक तपकिरी रंगाच्या रुपात असते.

एनएच-३ : हा कृषी प्रक्रियेतून उत्सर्जित होणारा अमोनिया आहे. तसेच त्याचा वायू कचरा, सांडपाणी आणि औद्योगिक प्रक्रियेतील दुर्गंधीतून उत्सर्जित होतो. ओ-३ म्हणजे ओझोन उत्सर्जन.

पीएम २.५ म्हणजे काय?

पीएम २.५ हा हवेत विरघळलेला एक छोटासा पदार्थ आहे. या कणांचा व्यास २.५ मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी आहे. जेव्हा पीएम २.५ ची पातळी जास्त असते तेव्हाच धुकं वाढते. दृश्यमानतेची पातळीही घसरते.

पीएम १० म्हणजे काय?

पीएम १०ला पार्टिक्युलेट मॅटर (Particulate Matter) म्हणतात. या कणांचा आकार १० मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा कमी व्यासाचा आहे. त्यात धूळ, घाण आणि धातूचे सूक्ष्म कण समाविष्ट आहेत. धूळ, बांधकाम आणि कचरा जाळण्यामुळे पीएम १० आणि २.५ अधिक वाढते.

वायू प्रदूषणाचा थेट शरीरावर परिणाम

डोळे, घसा आणि फुफ्फुसाचा त्रास वाढू लागतो. श्वास घेताना हे कण थांबवण्याची कोणतीही यंत्रणा आपल्या शरीरात नाही. अशा परिस्थितीत पीएम २.५ आपल्या फुफ्फुसात खोलवर पोहोचते. पीएम २.५ मुळे मुले आणि वृद्धांना सर्वात जास्त त्रास होतो. त्यामुळे डोळे, घसा आणि फुफ्फुसाचा त्रास वाढतो. खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होतो.

सततच्या संपर्कात राहिल्याने फुफ्फुसाचा कर्करोगही होऊ शकतो. हवा प्रदूषणामुळे घशात जळजळ, डोकेदुखीच्या समस्या वाढल्या. हवेतील प्रदूषणाची पातळी वाढल्याने फफ्फूस, दमा विकार असलेल्यांना काल त्रास झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

शहरातील हवेचे प्रदूषण मोजण्यासाठी एमआयडीसी परिसर, गिरणा पाण्याच्या टाकी, जुने बी.जे.मार्केट असे तीन ठिकाणी या ठिकाणी मोजणी केंद्र होते. सीएएक्यूएमएस स्टेशन प्रभात कॉलनीत आहे. सीएएक्यूएमएस स्टेशनवर प्रदूषणाची पातळी २०७ नोंदविली आहे. इतर स्टेशनची माहिती लवकरच येईल, अशी अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi यांची उपस्थिती; काँग्रेस प्रचाराचं रणशिंग फुंकणार! 'या' जिल्ह्यात पहिली रॅली काढणार

Palakkad Train Accident: केरळमध्ये एक्स्प्रेसच्या धडकेत 4 सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू! पलक्कडमध्ये घडली भीषण घटना

Rohit Sharma च्या घरी नवा पाहुणा येणार! Ritika चा तो फोटो अन् समालोचक हर्षा भोगलेंचं ते विधान...

Sports Bulletin 2nd November : भारताची न्यूझीलंडविरूद्ध विजयाच्या दिशेने वाटचाल ते भारताला ऑस्ट्रेलियात पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागणार

Video : महाराष्ट्रातील 'या' मंदिरात चक्क वाटला जातोय नोटांचा प्रसाद! कुठंए हे मंदिर? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT