Tehsildar B present in the review meeting of Taluka Level Grievance Redressal Committee of Pradhan Mantri Fruit Crop Insurance Scheme. A. Cotton, Taluka Agriculture Officer b. C. Valke and the present farmers and employees of the Department of Agriculture. esakal
जळगाव

Jalgaon Agriculture News : केळी पीकविम्याबाबत 15 दिवसांत सकारात्मक निर्णय; शेतकऱ्यांचा दिलासा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Agriculture News : मागील वर्षी केळी पीकविमा काढलेल्या ८ हजार ९९५ केळी उत्पादक शेतकऱ्यांचा पीकविमा मिळणे प्रलंबित आहे.

याबाबतचा सकारात्मक निर्णय १५ दिवसांच्या आत घेण्यात येईल, असे आश्वासन एग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले. (Positive decision on Banana Crop Insurance within 15 days by agriculture insurance company jalgaon news)

प्रधानमंत्री फळपीक विमा योजनेच्या तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीच्या आढावा बैठकीत तहसीलदार बी. ए. कापसे यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत या विमा कंपनीच्या मुंबई कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी हे आश्वासन दिले.

येथील तहसीलदार कार्यालयात मंगळवारी (ता. १९) तक्रार निवारण समितीची बैठक झाली. तहसीलदार श्री. कापसे अध्यक्षस्थानी होते. या वेळी उपस्थित अमोल पाटील, ज्ञानेश्वर पाटील व उपस्थित शेतकऱ्यांनी अजूनही शेकडो केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळाले नसल्याची बाब निदर्शनाला आणून दिली. याबाबत चौकशी करण्याची विनंती शेतकऱ्यांनी केली.

तालुका कृषी अधिकारी बी. सी. वाळके यांनी सांगितले, की जिल्हाधिकारी कार्यालयाने आवाहन केल्याप्रमाणे ज्यांना पीकविम्याची भरपाई जाहीर झाली नाही, त्यापैकी २ हजार ७८३ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत तर सुमारे ३ हजार शेतकऱ्यांनी थेट विमा कंपनीकडेही तक्रार अर्ज केल्याचे त्यांनी सांगितले.

या तक्रारी अर्जांवर निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांची विमा भरपाई प्रकरणे प्रलंबित आहेत, त्याबाबत विमा कंपनीचे स्थानिक प्रतिनिधी हेमंत शिंदे यांनी माहिती दिली. श्री. कापसे यांनी मुंबई कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली.

त्यावेळी सर्व प्रलंबित प्रकरणांचा निपटारा उशिरात उशिरा पंधरा दिवसांत करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी बैठकीला कॅनरा बँकेचे व्यवस्थापक सुशील बारेला, पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापक प्रशांत मेश्राम, शेतकरी प्रतिनिधी विशाल अग्रवाल, भास्कर महाजन, पंकज नारखेडे उपस्थित होते.

रावेर तालुक्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात

केळी पीकविमा काढलेले शेतकरी : ३०,१९४

पहिल्या टप्प्यात पीकविमा मंजूर शेतकरी : १६,४१४

भरपाई देण्यात आलेले शेतकरी : १२,९४६

भरपाई मिळण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी : ३,४६८

भरपाई मिळणे प्रलंबित शेतकरी : ८,९९५

केळी पीकविमा नामंजूर शेतकरी : ४,५८५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT