मेहुणबारे (जि. जळगाव) : चाळीसगाव-धुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून, तरवाडे बारी ते चाळीसगाव बायपासपर्यंत तर रस्त्यावर अक्षरश: खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या संदर्भात ‘सकाळ’मध्ये वेळोवेळी झळकलेल्या वस्तुनिष्ठ वृत्ताची दखल राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेतली असून, या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मातीमिश्रीत खडी टाकून खड्डे बुजविण्याची गांधीगिरी केली आहे. मात्र प्रत्यक्षात डांबर टाकून रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे. (pothole repairing start on Tarwade Bari to Chalisgaon Bypass after sakal action Jalgaon Latest Marathi News)
चाळीसगाव-धुळे महामार्ग हा जणूकाही मृत्यूचा सापळा झाला आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालविताना कुठून चालवावे, असा प्रश्न चालकांना पडलेला असतो. या रस्त्यावरील अपघात नित्याचाच झाला आहे. वाहनधारकांना अक्षरशः कसरत करून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
या संदर्भात मंगळवारी (ता.१४) दैनिक ‘सकाळ’च्या टुडे पान चारवर काय तो रस्ता, काय ते खड्डे' एकदम बेजार या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच राष्ट्रीय महामार्ग विभागाने दखल घेतली असून, या रस्त्यावरील खड्डयामध्ये मातीमिश्रीत खडी टाकण्याचे काम आज दुपारी मेहुणबारे - गिरणा पुलावर सुरू झाले होते.
महामार्गावरील दहीवद फाटा ते चाळीसगाव बायपासपर्यंतच्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मातीमिश्रीत खडी टाकली जात आहे. मात्र पुन्हा पाऊस आला तर याच खड्ड्यांमध्ये टाकलेली माती वाहून जाणार असून, पुन्हा खड्डे ‘जैसे थे’ होणार आहेत. तर सर्वांत मोठी समस्या धुळीची असून, वाहनधारकांना पाऊस गेल्यानंतर धुळीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे संबंधित विभागाकडून केवळ धूळफेक केली जात असल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.