जळगाव : येथील पवन फाउंडेशन जळगाव आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ (मुंबई) यांच्यातर्फे रविवारी (ता.११) जळगावला आंबेडकर मार्केट समोर सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन हॉलमध्ये एकदिवसीय सतरावे बहिणाबाई सोपानदेव खानदेश मराठी राज्य साहित्य संमेलन होणार आहे.
सकाळी दहाला खासदार उन्मेष पाटील, आमदार राजुमामा भोळे हे उद्घाटन करतील. संमेलनाध्यक्ष साहित्यीक डॉ.संजीवकुमार सोनवणे असतील. (Preparation for Bahinabai Sopandev Khandesh Marathi State Literature Conference is complete jalgaon news)
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ सदस्य धनंजय गुडसुरकर, सदस्य पुष्पराज गावंडे, स्वागताध्यक्ष अरविंद नारखेडे (नाट्यछटाकार ), कवी संमेलन अध्यक्ष ज्येष्ठ कविवर्य राजेंद्र दिघे असतील.
प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कवी वा.ना.आंधळे, माजी महापौर विष्णू भंगाळे, जयश्री महाजन, माजी नगरसेवक अमित काळे असतील. यावेळी बाल साहित्यिक माया दिलीप धुप्पड स्वलिखित काव्य चित्रांचे प्रदर्शन भरविले जाईल.
दुपारी एक ते दोन दरम्यान ‘मराठी भाषा अभिजाततेपासून दूर का आहे ? याविषयावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर असतील. परिसंवादक प्रा.डॉ.वंदना रवींद्र बडगुजर नंदवे, प्रा.डॉ.सत्यजित साळवे असतील.
दुपारी दोन ते तीन दरम्यान ‘कथाकथन’ होइल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ बाल साहित्यिक विलास मोरे असतील. कथाकार - राहुल निकम व डॉ.अ.फ.भालेराव असतील. पाचव्या सत्रात दुपारी तीन ते चार दरम्यान मराठी भाषा व इतर भारतीय भाषा यांच्यात परस्पर साहित्य व्यवहार वृद्धिंगत होण्याबाबत चर्चामंथन होइल.
मराठी भाषा ही आपली ज्ञानभाषा झाली पाहिजे’ याविषयीही चर्चा होइल. अध्यक्षस्थानी धनंजय गुडसुरकर असतील. पुष्पराज गावंडे , शैलजा करोडे चर्चा करतील. सहाव्या सत्रात चार ते पाच दरम्यान कवी संमेलन होईल. अध्यक्षस्थानी राजेंद्र दिघे असतील. समस्त कवी - कवयित्री यात सहभागी होतील.
समारोप सायंकाळी पाच ते सहा दरम्यान होइल. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.वासुदेव वले असतील. पुरस्कार वितरण व कवी कवयित्रींनी सहभाग सन्मानपत्रांचे वितरण होइल.
संमेलन कालावधीसाठी परिसरासाठी कविवर्य पुरुषोत्तम नारखेडे साहित्य नगरी, प्राचार्य प्र.श्रा. .चौधरी सभागृह,शिल्पकार / चित्रकार म.म.चौधरी काव्यचित्र प्रदर्शन दालन,रानकवी ना.धो.महानोर व्यासपीठ असे प्रासंगिक समयोचित नामकरण करण्यात आले आहे.
संमेलनास सन्माननीय उपस्थिती निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या नातसुना पद्माताई चौधरी व स्मिताताई चौधरी, निवृत्त प्रा.कमल पाटील, सुनील इंगळे, प्रा.संध्या महाजन, विशाखा देशमुख, साधना लोखंडे, पत्रकार तुषार वाघुळदे, कवी अशोक पारधे, शीतल पाटील, कवी संजय पाटील, किशोर नेवे मान्यवर उपस्थित राहतील.
असे आवाहन संमेलनाचे निमंत्रक डॉ.विलास नारखेडे, लिलाधर नारखेडे, कार्याध्यक्ष तुषार वाघुळदे व विजय लुल्हे, आयोजक रघुनाथ राणे व डॉ.संजय पाटील आदींनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.