Amalner Marathi Sahitya Sammelan : येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खानदेशातील लोककला आणि लोकसंगीत यांचेही सादरीकरण होणार आहे.
विशेष म्हणजे, या लोककलांचे सादरीकरण त्या- त्या लोककलांचे तज्ज्ञ व पारंपरिक पद्धतीने सादरीकरण करणारी मंडळे सादर करणार आहेत. या संमेलनात खानदेशी संस्कृतीचे दर्शन घडेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. (Presentation of Khandeshi folk arts held in Marathi Sahitya Sammelan jalgaon news)
येथे ३ फेब्रुवारीला दुपारी अडीच ते साडेचार दरम्यान सभामंडप ३ - बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृहात लोककला / लोकसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे संयोजन बापू हटकर व रमेश धनगर करणार आहेत.
या कार्यक्रमात खानदेशी वीरनृत्य, बंजारा नृत्य, धनगरी नृत्य, आदिवासींची पावरी नृत्य, नंदीबैल नृत्य, डोगऱ्यादेव वळीत नृत्यांबरोबरच खानदेशी वन्हे, तमाशा बतावणी, टिंगरी वाला, गोंधळ, भारूड, शाहिरी, संबळ, पावरी.
खानदेशातील लोकगीते ज्यात आखाजी, कानबाई, गौराई, लग्नाची गाणी आदी लोकगीते देखील सादर होणार आहेत.
यात 'कर्ण जन्मानी कहानी' हे भावस्पर्शी अहिराणी काव्यमय सादरीकरण हे खास आकर्षण राहणार आहे. या सर्व लोककला प्रकारातून जवळपास दीडशे लोककलाकारांना संधी मिळणार आहे, असे संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ अविनाश जोशी.
आयोजन समितीचे रमेश पवार, संयोजक बापूसाहेब हटकर, रमेश धनगर, वसुंधरा लांडगे यांनी सांगितले.
खानदेशी संस्कृतीचे दर्शन
याच दिवशी सभामंडप क्रमांक २ - कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात दुपारी साडेबारा ते दीड दरम्यान खानदेशी बोलीभाषांवर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून, यात अहिराणी, तावडी, भिल्ली, लेवा गणबोली, गुर्जर या बोलीभाषांचा समावेश करण्यात आला आहे.
डॉ. रमेश सूर्यवंशी (अहिराणी), अशोक कोळी (तावडी), डॉ. पुष्पा गावित (भिल्ली), डॉ. जतीनकुमार मेढे (लेवा गणबोली), डॉ. सविता पटेल (गुर्जर) हे सहभागी होतील.
रात्री आठ ते दहाला सभामंडप क्रमांक १ खानदेशकन्या बहिणाबाई चौधरी सभागृहात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या रचनांवर आधारित ‘अरे संसार संसार’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यात 'परिवर्तन' ग्रुपतर्फे ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, हर्षल पाटील व सहकलाकार सहभागी होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.