Jalgaon: Sadguru Nand Kumar Jadhav, Missionary of Sanatan Sanstha while inaugurating the state level Maharashtra Temple-Trust Council. From left- National Spokesperson of Hindu Janajagruti Samiti Ramesh Shinde, Acharya Mahamandaleshwar Mahant Sudhirdas Maharaj of Shri Kalaram Temple, Supreme Court Advocate Vishnu Shankar Jain, Raje Vijay Singh Jadhav of Balaji Deusthan Deulgaonraj, Trustee of Padmalaya Devasthan Ashok Jain. esakal
जळगाव

Jalgaon News | भारतात मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम शिकविण्याची गरज : अध्यक्ष अशोक जैन

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही. कोणतीही संस्था सुदृढ होणे, हे व्यवस्थापनावर अवलंबून असते; मात्र मंदिराच्या व्यवस्थापनाविषयी कोणताही अभ्यासक्रम भारतात शिकविला जात नाही. मंदिर परिषदेच्या माध्यमातून हे कार्य होत आहे. तीर्थक्षेत्र आणि मंदिरे यांच्या प्राचीन परंपरा आहेत.

ती पर्यटनस्थळे नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. मंदिरांच्या विश्वस्तांनी मंदिरांकडे पालकत्वाच्या भावनेने पाहणे आवश्यक आहे. विश्वस्तांनी हातात हात घालून मंदिरांच्या समस्या सोडविण्यासाठी एकत्र यायला हवे.

यादृष्टीने मंदिर परिषदेच्या माध्यमातून मंदिरांविषयीचा समान कार्यक्रम निश्चित होईल, असा विश्वास जळगाव येथील श्री पद्मालय गणेश देवस्थानचे विश्वस्त, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केला. (President Ashok Jain Need to teach temple management course in India State level Maharashtra Temple Nyas Parishad begins Jalgaon News)

हिंदू जनजागृती समिती, श्री गणपती मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळ (पद्मालय) यांच्या संयुक्त विद्यमाने मंदिरे आणि धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ दोनदिवसीय राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्‍घाटन सत्रात ते बोलत होते.

काशी येथील ज्ञानव्यापीसाठी लढा देणारे सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णू शंकर जैन, श्री काळाराम मंदिराचे आचार्य महामंडलेश्वर महंत सुधीरदास महाराज, देऊळगावराजा येथील श्री बालाजी देवस्थानचे विजयसिंहराजे जाधव, सनातन संस्थेचे सद्‍गुरू नंदकुमार जाधव, हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे उपस्थित होते.

राज्यभरातील विविध मंदिरांचे २५० पेक्षा अधिक प्रतिनिधी या मंदिर परिषदेत सहभागी झाले आहेत. ‘मंदिर प्रतिनिधींच्या एकत्रीकरणाची आवश्यकता’, ‘पुजाऱ्यांच्या अडचणी आणि उपाय’, ‘मंदिरांच्या माध्यमातून हिंदूंचे संघटन’, ‘मंदिरांचे सुप्रबंधन’, ‘प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार, स्वच्छता, आर्थिक अडचणी’, अशा विविध विषयांवर या परिषदेत ऊहापोह होत आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

मंदिर विश्वस्तांचे संघटन हवे

महंत सुधीरदास महाराज म्हणाले, की मंदिरांतील पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सध्या केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर भारतामध्ये देवस्थानाचे प्रश्न बिकट होत आहेत. मंदिरांचे अधिग्रहण करून त्यामध्ये अहिंदूंची नियुक्ती केली जात आहे. यामुळे मंदिरांतील परंपरा नष्ट होत आहेत. मंदिरांतील परंपरागत पूजाविधी पुन्हा चालू होणे आवश्यक आहे. मंदिरातील पैसा धर्मकार्याव्यतिरिक्त अन्यत्र वापरला जात आहे. या परिषदेच्या माध्यमातून मंदिरांतील धर्मपरंपरांच्या रक्षणार्थ मंदिर विश्वस्तांचे संघटन होईल.

हिंदू संस्कृती रक्षणाचा लढा

अधिवक्ता जैन म्हणाले, की हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी सर्वप्रथम मंदिरांना लक्ष्य करण्यात आले. अयोध्या, मथुरा, काशी यांसह असंख्य ठिकाणी देवतांच्या मंदिरांची आणि मूर्तींची तोडफोड करून त्या ठिकाणी मशिदींची निर्मिती करण्यात आली. काशी विश्वेश्वराचे मंदिर तीन वेळा पाडण्यात आले. काशी विश्वेश्वराचे मंदिर मुक्त

करावे, ही छत्रपती शिवाजी महाराज यांची शेवटची इच्छा होती. ती पूर्ण होण्याची वेळ आता दूर नाही. हिंदूंनी ही सर्व मंदिरे मुक्त करायला हवीत. काशी विश्वनाथ मंदिरासाठीचा लढा हा हिंदूंच्या संस्कृती रक्षणाचा लढा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Result: अजितदादांचा आनंद द्विगणित! पुण्यातील आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? 'या' तीन नावांची चर्चा

IND vs AUS : Yashasvi Jaiswal च्या दीडशतकी खेळीने रचला नवा विक्रम ; दिग्गजांमध्ये स्थान मिळवणारा पहिला भारतीय

Adampur Firing : भरदिवसा दोन टोळ्यांमध्ये गोळीबारचा थरार; एकमेकांवर झाडल्या गोळ्या, आदमापुरात नेमकं काय घडलं?

Girish Mahajan : गिरीश महाजन ठरले पुन्हा संकट मोचक; बंडखोरी थोपविण्यात यश

Nashik East Assembly Constituency : बालेकिल्ला शाबूत, ढिकलेच ‘पहिलवान’

SCROLL FOR NEXT