Jalgaon anti-corruption protest march. esakal
जळगाव

Jalgaon News: कापसाला भाव द्या, बोगस डॉक्टरांवर कारवाई करा; भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटनेचा धडक मोर्चा

शेतकऱ्यांच्या कापसाला मालाला भाव देऊन चोवीस तास वीज पुरवठा करावा, आदी मागण्यांसाठी काल भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शेतकऱ्यांच्या कापसाला मालाला भाव देऊन चोवीस तास वीज पुरवठा करावा, जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी, पंतप्रधान ग्राम सडक योजनेसह विविध योजनेतील रस्त्यांच्या कामाची चौकशी व्हावी,

ज्या खासगी शिक्षण संस्था थोडी फी राहिली असता मुलांना मुलींना परीक्षेला बसू देत नाही अशा संस्थांवर कारवाई व्हावी, आदी मागण्यांसाठी काल भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. (Price Cotton Take Action Against Bogus Doctors Dhadak Morcha of Anti corruption akrosh Organization Jalgaon News)

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल व्हानमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष शेख गुलाब मामू, उत्तर महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष वसंतराव सूर्यवंशी, सहसचिव रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष रामेश्वर लोहार, धुळे जिल्हाध्यक्ष राजू जाधव, बाबूराव बोंडे, जिल्हा संघटक सुनील काटे यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.

संपर्कप्रमुख प्रभाकर सोनवणे, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष ब्रिजलाल गवळी, जामनेर तालुका अध्यक्ष युवराज खैरे, यावल तालुका अध्यक्ष अनिल लोहार, मधुकर लोहार, सदस्य ईश्वर बळिराम, यशवंत शिंपी, दिलीप खोडे, बाबूराव बोंडे, साहेबराव घटे, जमीन पटेल, संतोष पाटील, श्रीराम कोळी, राजू पाटील, सुरेश कुंभार अनिल पाटील आदींनी सहभाग घेतला.

आंदोलकांच्या मागण्या

जिल्ह्यात ग्रामसेवक तलाठ्यांना सजा नोकरीच्या ठरवून दिलेले ठिकाणी राहण्याची सक्ती करावी, अन्यथा कारवाई व्हावी. बोगस डॉक्टरांवर त्वरित कारवाई व्हावी, जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील घरकुल व इतर शासकीय योजना त्वरित लाभार्थ्यांना देण्यासाठी आदेश पारित व्हावा.

विधवा व दिव्यांग यांना त्वरित रेशन कार्ड व अर्थसाह्याच्या सर्व शासकीय योजनांचे अंमलबजावणी त्वरित व्हावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''एकनाथ शिंदेंना नाराज करता येणार नाही'' दिल्लीतल्या नेत्यांची भूमिका? अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर? 'सीएम'ची घोषणा होण्याची शक्यता

RCB Squad IPL 2025: काहे दिया परदेस! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं 'विदेशी' प्रेम; भुवनेश्वर, कृणाल पांड्याची निवड ठरणार मास्टरस्ट्रोक

Ajit Pawar: अजित पवार विनासुरक्षा 'देवगिरी'तून बाहेर पडले; मुख्यमंत्री पदावरुन घडामोडींना वेग

IPL Mega Auction 2025: ३० लाख ते ३.८० कोटी! युवीच्या 6 Ball 6 Six विक्रमाशी बरोबरी करणाऱ्या Priyansh Arya साठी तगडी चुरस

महाराष्ट्राचं स्टेअरिंग दिल्लीच्याच हातात! बिहार पॅटर्नवर फुली? मुख्यमंत्रीपदाबाबत पडद्याआड नेमकं घडतयं तरी काय?

SCROLL FOR NEXT