Jalgaon Crime : खुनाच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात बंदीवान असलेल्या कैद्याने भरदिवसा तुरूंगातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. जेलच्या गेटवरुन हा भामटा पळून जात असताना त्याला जिल्हाधिकारी कर्यालयाच्या गेटवर शिताफीने पाठलाग करुन पकडण्यात यश आले असून, त्याच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Prisoner caught after pushing police Jalgaon Crime)
विजय चैत्राम सावकारे (वय २३, रा. चुंचाळे ता. यावल) असे या कैद्याचे नाव आहे. तो खूनाच्या गुन्ह्यात दीड वर्षांपासून कारागृहात आहे. रविवारी (ता. १७) पहाटे सव्वा सहाच्या सुमारास पोलीस शिपाई निवृत्ती काशिनाथ पवार हे संदीप अर्जुन थोरात, दिनेश दत्तू बारी, नागनाथ सुदाम येईल्वाड यांच्यासह कारागृहाच्या मेन गेटवर ड्युटीवर होते.
सव्वासहाच्या सुमारास बाहेरून कुणीतरी दरवाजा ठोठावला. पवार यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता, त्यांना कोणीही न दिसल्याने त्यांनी दरवाजा उघडून बघितले. त्याचवेळी सावकारे हा पोलिसांना धक्का देवून पळून गेला.
त्यावर सर्वांनी आरडा-ओरड करतच सावकारेचा पाठलाग केला. मात्र, काही क्षणातच तो दिसेनासा झाला. याचवेळी कारागृहाच्या दिशेने येत असलेले कारागृह शिपाई अनंत केंद्रकर व गणेश सोनवणे याना विजय हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेद्वारातून बाहेर पडताना दिसताच त्यांना संशय आला.
तोपर्यंत पाठीमागून सर्व कर्मचारी पळत येतांना दिसल्याने घडला प्रकार लक्षात येताच त्यांनी विजयला झडप मारुन ताब्यात घेतले व पुन्हा त्याची कारागृहात रवानगी केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर पवार यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख तपास करीत आहेत.
कारागृह सुरक्षेचा विषय ऐरणीवर
जिल्हा कारागृहातून कैद्याचे पलायन हा विषय नविन राहिलेला नाही. यापुर्वीदेखील तीन कैद्यांनी चक्क सुरक्षारक्षकाला पिस्तुल लावून पळ काढला होता.
कारागृहातील बंदीवानाकडून कार्यालयाची आणि परिसराची साफसफाई करण्यासाठी त्यांना मुख्य प्रवेशद्वारापर्यंत येण्याची मुभा दिली जाते, असेही सांगीतले जाते. त्यामुळे कारागृहाचे नियम धाब्यावर बसवुन मुख्य प्रवेशद्वारापर्यंत कैदी येतोच कसा? असा प्रश्न आता उपस्थीत होऊ लागला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.