Jalgaon News : बँकांमधील गुंतवणुकीला अत्यल्प व्याजदर आणि शेअर बाजारातील गुंतवणूक सुरक्षित नसताना सोन्याने मात्र ग्राहक व पर्यायाने गुंतवणूकदारांना गेल्या काही वर्षांत दुप्पट, तिपटीने परतावा देऊन खूश केलेय. (profit in gold Investment 100 percent return in just 4 years jalgaon news)
सोन्याला सध्या आलेले ‘सोन्या’चे दिवस पाहता सोने-चांदीतील गुंतवणूक वाढतेय, हे वेगळे सांगायची गरज नाही. भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांची वेगळी क्रेझ आहे. सौंदर्य खुलविण्यात या दागिन्यांचे योगदान वादातीत म्हणून विशेषतः महिलांना सोन्याच्या दागिन्यांचे कमालीचे आकर्षण.
परंतु गेल्या काही वर्षांत, दशकांत सोन्याकडे चांगला परतावा देणारी गुंतवणूक म्हणूनही पाहिले जातेय. त्यामुळे केवळ महिलाच नव्हे, तर पुरुष मंडळीलाही सोन्याने भुरळ घातल्याचे दिसतेय. म्हणूनच सोने खरेदीकडे अलीकडच्या काळात बऱ्यापैकी कल वाढलाय. आता त्याचा भाव शिखरावर असतानाही सोने खरेदी कमी झालेली नाही, उलटपक्षी ती वाढतच आहे.
सोने दरवाढीचा चढता आलेख
गेल्या ३०-४० वर्षांचा विचार केला, तर सोन्याचा दर दरवर्षी वाढताच आहे. ५० वर्षांपूर्वीच्या काळात गेलो तर १९७५ मध्ये सोन्याचा प्रतितोळा (१० ग्रॅम) दर अवघा ५४० रुपये होता. १९८० मध्ये तो दुपटीपेक्षा जास्त वाढून १३३० रुपये, तर १९८५ मध्ये २१३० रु. झाला.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
१९९० ते २००० या दशकात सोन्याचा भाव ३२०० वरून ४४०० रुपये झाला. शतकाच्या प्रारंभी २००० मध्ये अवघा ४४०० रुपये प्रतितोळा असलेला सोन्याचा दर त्यानंतरच्या केवळ सहा-सात वर्षांत पाच आकडी म्हणजे दहा हजार रुपयांवर पोचला.
दहा वर्षांत तिप्पट
२०१० मध्ये १८ हजार रुपये प्रतितोळा असलेले सोने २०१५ मध्ये २६ हजार ४०० वर पोचले आणि गेल्या आठ वर्षांत त्यात टप्प्याटप्प्याने मोठी वाढ होऊन २०२२ च्या वर्षी सोन्याचा भाव ५२ हजारांपर्यंत व आज तब्बल ६० हजारांवर पोचला आहे. म्हणजे गेल्या दहा वर्षांत सोन्याच्या दराने तिपटीहून अधिक परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे.
ही आहेत दरवाढीची कारणे
गेल्या दहा-पंधरा वर्षांत, त्यातही अलीकडच्या तीन-चार वर्षांत सोन्याला अक्षरशः ‘सोन्या’चे दिवस आलेत. २०१८ मध्ये केवळ ३२ हजार रुपये प्रतितोळा सोने होते, ते आज ६० हजारांवर पोचले. म्हणजे चारच वर्षांत शंभर टक्के दरवाढ झाल्याचे त्यातून दिसते.
त्यामागे आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी, अमेरिकेतील आर्थिक अनिश्चितता, वर्षभरापासून सुरू असलेले रशिया- युक्रेन युद्ध, त्याचा जागतिक पातळीवरील परिणाम, जागतिक मंदी असे घटक कारणीभूत आहेत. सोन्याचा दर कमालीचा वाढत असताना त्याची मागणी कमी झालेली नाही.
असे वर्ष अशी वाढ
वर्ष ------ भाव (१० ग्रॅमसाठी)
१९७५ ---- ५४० रुपये
१९८० ---- १,३३०
१९८५ ---- २,१३०
१९९० ---- ३,२००
२००० ---- ४,४००
२००१ --- -४,३००
२००५ ---- ७,०००
२०१० ---- १८,०००
२०१५ ---- २६,४००
२०१६ ---- २८,६००
२०१७ ---- ३०,०००
२०१८ ---- ३२,०००
२०१९ ----- ३९,०००
२०२० ----- ४२,०००
२०२१ ---- ४७,८००
२०२२ ---- ५१,८००
२०२३ ---- ५९,०००
"सोन्यातील गुंतवणूक अन्य कुठल्याही गुंतवणुकीपेक्षा अधिक परतावा देणारी ठरली आहे. विशेष म्हणजे, या गुंतवणुकीत सुरक्षेसह आपत्कालीन स्थितीत तत्काळ रोख रक्कम मिळण्याची हमी असल्याने ग्राहकांचा त्याकडे अधिक कल दिसून येतोय." - सुशीलकुमार बाफना, संचालक, आर. सी. बाफना ज्वेलर्स
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.