Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon Municipality News: महापालिकेत नवीन वर्षात कर्मचाऱ्यांची पदोन्नती; 1997 नंतर प्रथमच मिळणार नवीन पद

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : जळगाव महापालिकेत सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात येणार आहे. १९९७ नंतर प्रथमच तब्बल वीस वर्षांनंतर ही पदोन्नती देण्यात येणार आहे. (Promotion of employees in municipal corporation in new year jalgaon news)

जळगाव पालिका असताना १९९७ मध्ये कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली होती. त्यानंतर पदोन्नतीस पात्र असूनही पालिका प्रशासन व महापालिका झाल्यानंतरही तत्कालीन आयुक्तांनी पदोन्नती दिलीच नाही. अनेक कर्मचाऱ्यांकडे वरिष्ठ पदाचा कारभार सुरू होता, मात्र त्यांना वेतनश्रेणी लागू नव्हती.

२०११ मध्ये सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यात आली होती; परंतु त्यावर हरकती व सुनावणी घेण्यात आली नाही. त्यानंतर आयुक्त डॉ. विद्या गायकवाड व सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त अविनाश गांगोडे यांनी याकडे लक्ष देत प्रशासकीय कार्यवाही वेगाने सुरू केली.

पदोन्नती देण्यापूर्वी सर्व अधिकारी व कर्मचारी यांची सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यात आली आहे. सोबतच त्याचा आकृतिबंध तयार करून त्यास मंजुरीही घेण्यात आली आहे. सेवा प्रवेश नियमावली तयार करून त्यास शासनाने मंजुरीही दिली आहे.

सेवाज्येष्ठता यादी तयार करताना २०२१-२२ नुसार सेवाज्येष्ठता यादी तयार केली आहे. त्यावर हरकती व सुनावणी २२ डिसेंबरला करण्यात येणार आहे. त्यानंतर सेवाज्येष्ठता यादी अंतिम करून त्यास मंजुरी घेण्यात येईल.

नवीन वर्षाची मिळणार भेट

जानेवारी २०२४ मध्ये सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात येणार आहे. तब्बल २६ वर्षांनंतर महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांना नववर्षाची भेट ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती 200 पार; महाविकास आघाडीची मोठी निराशा

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT