Prospective candidates for local self government elections started preparations for election jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon Election News : एरंडोलला राजकीय हालचाली गतिमान; राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांची ‘पायाभरणी’

आल्हाद जोशी

Jalgaon Election News : नगरपालिका, जिल्हापरिषद व पंचायत समिती यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांवर सुमारे दीड ते दोन वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू असल्यामुळे या संस्थांच्या निवडणुका केव्हा होणार? असा प्रश्न राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवारांनी निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने जोरदार पूर्वतयारी सुरू केली आहे. (Prospective candidates for local self government elections started preparations for election jalgaon news)

नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हापरिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थावर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळत असते. स्थानिक स्वराज्य संस्थांवर सुमारे दीड वर्षापासून प्रशासकीय राजवट सुरू असल्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम केव्हा जाहीर होणार? असा प्रश्न राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उपस्थित केला जात आहे.

सुमारे दोन वर्षांपासून निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी पूर्वतयारी सुरू केली असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जात आहे. नगरपालिकेवर दीड वर्षांपासून तर पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर पंधरा महिन्यांपासून प्रशासकीय राजवट असल्यामुळे शहरासह ग्रामीण भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांवर असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नागरिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात. शहरासह ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रतीक्षा केली जात असून, इच्छुक उमेदवार विविध कार्यक्रमास उपस्थित राहून मतदारांच्या भेटी घेत आहेत. शहरात वाढदिवसानिमित्त लावण्यात येणाऱ्या शुभेच्छा फलकांवर भावी नगराध्यक्ष, भावी नगरसेवक, भावी जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य असा उल्लेख उमेदवारांच्या समर्थकांकडून केला जात असल्यामुळे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सर्वच राजकीय पक्षांच्यावतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत नियोजन केले जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून वर्चस्व सिद्ध करण्याचे आव्हान सर्वच पक्षांसमोर उभे राहिले आहे.

तालुक्यातील जिल्हापरिषद आणि पंचायत समितीमध्ये यापूर्वी शिवसेनेची एकहाती सत्ता होती. मात्र शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर आमदार चिमणराव पाटील शिंदे गटात सहभागी झाल्यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

नगरपालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्ष भाजपचे होते. मात्र सर्वाधिक नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निवडून आले होते. नगरपालिका निवडणुकीनंतर शहरात नवीन राजकीय समीकरणे निर्माण झाले असून, दोन कट्टर विरोधक राजकीय व वैयक्तिक मतभेद दूर करून एकत्र आल्यामुळे त्याचा फायदा कोणाला होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोन राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी एकत्र आल्यामुळे शहरातील मतदारांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू असून, त्याचा परिणाम नगरपालिका निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.

बदलती राजकीय समीकरणे

शहरात भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संघटन मजबूत असले तरी भाजपमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांमुळे दोन गट पडले आहेत तर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये देखील अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत.

शिवसेनेचे देखील शहरात संघटन मजबूत असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. शहरात कॉंग्रेसचे अस्तित्व नगण्य आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्यामुळे त्याचे नियोजन करण्याचे प्रयत्न पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

Latest Marathi News Updates : अजित पवार यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांच्या देवगिरी बंगल्यावर फेऱ्या

SCROLL FOR NEXT