Officials of Electricity Workers' Federation during the protest.  esakal
जळगाव

Mahavitaran Worker Protest : नियमबाह्य बदल्या थांबविण्यासाठी कामगारांचे धरणे सुरू

Mahavitaran Employee Transfer : बदली प्रक्रियेची चौकशी होईपर्यंत आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mahavitaran Employee Transfer : महावितरणने तंत्रज्ञांच्या केलेल्या प्रशासकीय बदल्या नियमबाह्य असून, प्रशासकीय परिपत्रकाचा नियमभंग झाला आहे.

बदली प्रक्रियेची चौकशी होईपर्यंत आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने केली आहे. त्यासाठी विभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. (protest of federation against Mahavitaran administration jalgaon news)

कामगार महासंघाने ४ जुलैला वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन बेमुदत धरणे आंदोलनाबाबत माहिती दिली आहे. या वर्षापासून जळगाव विभागातील अनागोंदी कारभार समोर आला आहे.

प्रशासकीय व विनंती बदल्यांसंदर्भात कंपनीचे निश्चित धोरण परिपत्रक ५१४ मध्ये नमूद आहे. मात्र, या परिपत्रकाला जळगाव विभागाने धाब्यावर ठेवले आहे. या परिपत्रकात बदल्यांबाबतचे मार्गदर्शन तत्त्वांचे उल्लंघन करून वरिष्ठ तंत्रज्ञ पदाच्या १५ कर्मचारी आणि तंत्रज्ञ पदाच्या चार कर्मचाऱ्यांच्या बदल्या नियमबाह्य केल्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महावितरणच्या जळगाव विभागाने प्रशासकीय बदल्या नियमबाह्य पद्धतीने केल्या असून, या बदली प्रक्रियेची चौकशी होईपर्यंत त्याला स्थगिती मिळणे गरजेचे आहे. याबाबत पत्र देऊन विनंती केली. तरीही बदली केलेल्या कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त केले आहे.

या प्रशासनाच्या मुजोर व मनमानी पद्धतीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनात विभागीय, सर्कल, झोन, असे तिन्ही कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT