Jalgaon News : उन्हाळी सुटीनंतर नवीन शैक्षणिक वर्ष गुरूवार (ता. १५)पासून सुरू होत असल्याने जिल्हाभरातील विविध माध्यमांच्या शाळा गजबजणार आहेत. त्यासाठी आता विद्यार्थ्यांसह पालकांची सर्वत्र शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे.
यंदा शैक्षणिक साहित्याच्या दरामध्ये सरासरी पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पालकांच्या खिशाला मात्र चाट बसत आहे. (purchase of educational materials about begin 5 to 10 percent increase in price of materials like parents pockets Jalgaon News)
प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना पूस्तके मोफत मिळणार आहेत. मात्र, ईतर शैक्षणिक साहित्य, दप्तर, वॉटर बॅग, कंपास, टिफिन, बुट, स्पोर्ट शूज विकत घ्यावे लागतात. खासगी माध्यमांच्या शाळेत, तर पूस्तकांसह वह्या व इतर सर्वच साहित्य बाहेरून विकत घ्यावे लागते.
गुरूवारपासून शाळा सुरू होणार असल्या, तरी काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोमवारपासूनच (ता. १२) सूरू होणार आहेत.
यामुळे शनिवारी (ता. १०) शालेय पुस्तक विक्रीच्या सर्वच दुकानांवर विविध साहित्य, दप्तर, वॉटर बॅग आदी शालेय साहित्य खरेदीसाठी झुंबड उडाली होती.
वह्यांचे दर असे...
शंभर पानी साधी वही : २४ ते ३० रुपये नग
दोनशे पानी साधी वही : २५ ते ३५ रुपये नग
क्वायरबुक २०० पानी : ५०-७५ रुपये
क्वायरबुक १०० पानी : ४० ते ५० रुपये
चिमुकल्यांचा खर्च अधिक
लहान मुलांच्या स्कूल बॅग, वाटर बॅग, वह्या, इंडिग बुक, कंपास पेटी, गणवेश आदींच्या दरांतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मोठ्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चापेक्षा लहान मुलांच्या शिक्षणाचा खर्च जास्त येत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मोफत पाठ्यपुस्तकांमुळे दिलासा
यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आहेत. सर्व शाळांना एकच गणवेश राज्य शासनाने जाहीर केला आहे.
तोही एकाच दिवशी वाटप केला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. असे असले, तरी अद्याप शाळांच्या नावावर निधी जमा न झाल्याने विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार की नाही? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
"शासकीय पुस्तकांच्या किमती वाढल्या आहेत. इतर शालेय साहित्याच्या दरातही पाच ते दहा टक्के वाढ झाली आहे. सर्वच वस्तूंचे दर वाढल्याने शालेय साहित्याच्या दरात वाढ झाली आहे."
-अनंत वाणी, संचालक, वृंदा बुक डेपो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.