Radhakrishna Game : जिल्हा परिषद योजनांची व्यापक स्वरूपात अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिकोनातून तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांनी थेट गावात जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करून उणीवांवर मार्ग काढण्याची आवश्यकता असल्याचे मत नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केल.
जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात गुरुवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. त्यांनी जिल्हा परिषदेत जिल्हास्तरीय विकास कामांचा आढावा घेतला. (Radhakrishna Game statement Go village level for implementation of schemes jalgaon news)
याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (विकास) चंद्रकांत गुड्डेवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्यासह जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे विभाग प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.
योजनांचा आढावा
या वेळी विविध योजनांचा आढावा घेताना त्या योजनेची उद्दिष्ट व आतापर्यंत झालेल्या कामांची माहिती विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी जाणून घेतली. शासनाच्या विविध घरकुल योजनांचा आढावा घेतांना श्री.गमे म्हणाले, घरकुल योजनेची अंमलबजावणी करताना अडचणींवर मात करून थेट शेवटच्या घटकापर्यंत या योजना पोहोचतील याची काळजी घेणे गरजेचे आहे. गटविकास अधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी थेट गाव पातळीवर जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करावी व मंजूर घरकुलांचे कामे का थांबले आहेत, याची माहिती घेऊन मार्ग काढावा.
या दिल्या सूचना
जोपर्यंत अधिकारी कार्यालय सोडून गावागावात जाऊन ग्रामस्थांशी थेट चर्चा करत नाही तोपर्यंत शासकीय योजनांचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकत नाही त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे देखील ते म्हणाले. घरकुलांची प्रस्ताव पात्र करण्यात जातीच्या दाखल्यांची येत असलेली अडचण दूर करण्याच्या दृष्टीने तालुका पातळीवर किंवा गाव पातळीवर वेगवेगळ्या तारखांना कॅम्प लावून जातीचे दाखल्यांचे वितरण करावे, अशा सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.
‘जल जीवन मिशन’च्या कामांना गती द्या
विविध विकास कामांसाठी मंजूर असलेला निधी विहित मुदतीत व लवकर खर्च करण्यावर भर देण्याची सूचना देखील यावेळी देण्यात आली. जलजीवन मिशनमध्ये आतापर्यंत जळगाव जिल्ह्याचा 94% खर्च झालेला असला तरी प्रशिक्षित मनुष्यबळाची अडचण होत असली तरी देखील जल जीवन मिशनच्या कामांना गती देणे गरजेचे आहे.
सोबतच सार्वजनिक शौचालय यांची कामे देखील लवकरात लवकर पूर्ण करा, माजी वसुंधरा अभियानात स्पर्धात्मक दृष्टीने भाग घेऊन क्रमांक मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवा, बचत गटांना प्रोत्साहन तांत्रिक अडचणी येणार नाही याची काळजी घ्या त्यासाठी बैठका व सुनावण्या घेऊन त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. कुपोषण मुक्तीसाठी आरोग्य विभाग व महिला बाल विकास विभागाने मोहीम राबवून पूर्णतः कसोशीने प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने जळगाव जिल्हा परिषदेने चांगली कामगिरी केली आहे. त्यासोबत घरकुल, जल जीवन मिशन, तसेच कुपोषण मुक्ती सारख्या कार्यक्रमांमध्ये जळगाव जिल्ह्याने घेतलेल्या आघाडीबद्दल श्री गमे यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे अभिनंदन देखील यावेळी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.