Crime News  esakal
जळगाव

Jalgaon : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कुंटणखान्यावर धाड

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील नवी पेठ या मध्यवर्ती बाजारपेठेसह उच्चभ्रू वस्तीत चक्क कुंटणखाना चालविला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून सहा महिलांसह ग्राहकाला रंगेहाथ अटक केली. राजकीय वरदहस्ताने हा कुंटणखाना चालविला जात असल्याचे आढळले असून, शहर पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या नवी पेठेतील महावीर सहकारी बँकेच्या मागील गल्लीत हायप्रोफाइल कुंटणखाना चालविला जात असल्याची गुप्त माहिती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना मिळाली होती.(Raid on Brothel in center of city Jalgaon Crime News)

त्यांच्यासह उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, गुन्हे शोधपथकातील रतन गिते, तेजस मराठे, योगेश बोरसे, भास्कर ठाकरे, गजानन बडगुजर, वैशाली पावरा, स्वप्नाली सोनवणे आदींच्या पथकाने इमारतीला घेराव घालत छापा टाकला. वसंत बरडे यांच्या नावाने असलेल्या रहिवासी इमारतीमधील फ्लॅट त्रयस्थ व्यक्तीला सात हजार रुपये भाड्याने देण्यात आला होता. त्याच ठिकाणी कुंटणखाना मालकीण हायप्रोफाइल पद्धतीने कुंटणखाना चालवत असताना आढळली. फ्लॅटमध्ये आक्षेपार्ह साहित्यासह महिला आढळल्या आहेत. एक अमरावती जिल्ह्यातील महिला असून, उर्वरित जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांतील रहिवासी आहेत. शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू होते. वैद्यकीय तपासणीअंती या महिलांना सुधारगृहात रवाना करण्यात येऊन गुरुवारी (ता. १२) सकाळी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे श्री. ठाकूरवाड यांनी सांगितले.

घरमालकासह भाडेकरू महिलेवर गुन्हा

वासुदेव बद्रीनाथ बेर्डे (९१, नवी पेठ) यांच्या मालकीच्या घरात कुंटणखाना मालकीण म्हणून एक महिला भाड्याने घर घेऊन बाहेरून महिला आणून कुंटणखाना चालवत असल्याप्रकरणी उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्या तक्रारीवरून घरमालकासह कुंटणखाना मालकीण यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

राजकीय व्यक्तीच्या नावाची चर्चा

नवी पेठसारख्या उच्चभ्रू वस्तीत कुंटणखाना चालविण्याची हिंमत कुणी करेल ही बाब अशक्यप्राय आहे. असे असताना पूर्वी कार्यालयासाठी भाड्याने दिलेल्याच फ्लॅटमध्ये हा सर्व गैरप्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. साधारण चार वर्षांपूर्वी गोलाणी व्यापारी संकुलातील तिसऱ्या मजल्यावरील कुंटणखान्यावर छापा पडला हेाता. त्यानंतर गेल्यावर्षी गोलाणी मार्केटच्या याच गाळ्यांमध्ये अल्पवयीन बालीकेवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. तेव्हा एका माजी नगरसेवकाच्या नावाने त्यांचा कार्यकर्ता आणि भाऊ या अवैध धंद्यांची वसुली करत असल्याचे उघडकीस आले होते. आजही त्याच मंडळींच्या नावाची चर्चा शहर पोलिस ठाण्यात होती. कुठल्याही मातब्बर व्यक्तीच्या सहकार्याशिवाय अवैध धंदा चालविला जात नसल्याचे सांगण्यात आले असून, तपासात या सर्व बाबींचा उलगडा होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT