Jalgaon city received moderate rainfall on Thursday  esakal
जळगाव

Jalgaon Rain Update : महिनाभर उशिरा... पावसाच्या सुखद जलधारा! जळगाव शहराला दिलासा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Rain Update : मॉन्सूनचे आगमन होऊन, रोज ढगांची गर्दी करूनही जळगाव जिल्ह्याला हुलकावणी देत बळीराजाची चिंता वाढविणाऱ्या वरुणराजाने बुधवारी (ता. ५) रात्री व गुरुवारी (ता. ६) जळगाव शहरासह जिल्ह्यात चांगलीच हजेरी लावली.

महिनाभर उशिरा दाखल झालेल्या पावसाच्या जलधारांच्या अनुभवाने जळगावकर सुखावले. गुरुवारी दुपारी शहरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. (rain update rainfall in on 5 and 6 july jalgaon news)

काही ठिकाणी नागरिकांची त्रेधा उडाली.

यंदा मॉन्सूनचे राज्यातील आगमन लांबले होते. ‘बिपरजॉय’ वादळाने हवेतील बाष्पच पळवून नेले आणि नंतरच्या टप्प्यात राज्यात दाखल झालेला मॉन्सून कोकणातच रेंगाळला. जवळपास दोन आठवडे तो कोकण, मुंबईच्या किनारपट्टीवर रेंगाळल्यानंतर जूनच्या अखेरीस त्याने महाराष्ट्र व्यापला.

जिल्ह्यावर रुसवा

राज्यात इतरत्र पावसाची हजेरी लागत असताना, जळगाववर मात्र तो रुसला होता. पावसाळ्यातील जून उलटूनही जळगाव जिल्ह्यात त्याची हजेरी लागली नव्हती. काही दिवसांपासून ढगांची गर्दी होत होती. मात्र, पाऊस हुलकावणी देत होता. ‘मे हीट’मधून होरपळलेल्या जळगावकरांना व थोडीबहुत पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मात्र पावसाची प्रतीक्षा होती.

अखेरीस बरसला

शेवटी महिनाभर उशिरा का होईना, पावसाचे सुखद आगमन जळगाव जिल्ह्यात झाले. तसे मंगळवार (ता. ४)पासूनच त्याने जिल्ह्यातील काही भागांत तुरळक हजेरी लावली. मात्र, बुधवारी रात्री व गुरुवारी दुपारपासून पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पावसामुळे वाहनधारकांचीही पंचाईत झाली

शहरात दुपारी जोरात

जळगाव शहरात बुधवारी रात्री तुरळक पाऊस झाला. त्यामुळे वातावरणातील उकाडा वाढला होता. गुरुवारी दुपारी मात्र ढगांची गर्दी होऊन जोरदार पावसाला सुरवात झाली. पाऊस येणारच नाही, या खात्रीवर बाहेर पडलेल्या नागरिकांची या पावसाने चांगलीच पंचाईत केली. बाजारात छत्री, रेनकोट खरेदीसाठी बाहेर पडलेले नागरिक या पहिल्याच पावसात चिंब भिजले.

रस्त्याचे काम चव्हाट्यावर

गुरुवारी दुपारी जळगाव शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. खूप जोरदार पाऊस झाला नसला, तरी या कमी पावसानेही जळगावातील रस्त्यांची कामे चव्हाट्यावर आणली. गेल्या काही महिन्यांत शहरात रस्त्यांची कामे झाली आहेत.

कुठे भुयारी गटारांचे चेंबर वर आहेत, तर कुठे दोन टप्प्यांत रस्ता होऊन त्या रस्त्याचा मधला टप्पा बाकी आहे. अशा न झालेल्या रस्त्यांमध्ये पावसाचे पाणी तुंबून वाहनधारकांचे हाल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT