rainfall pattern has changed but farmers crop pattern was not changed  esakal
जळगाव

Agriculture News : पावसाचा ‘पॅटर्न’ बदलला, तरी पीक पॅटर्न बदलेना; नगदी पीक म्हणून कापूस, केळीकडेच ओढा..

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यात अवकाळी पाऊस आता केव्हाही पडत आहे. मार्चमध्ये दोनदा अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसला. यंदा ‘अल निनो’मुळे तापमानवाढीच्या धोक्यासोबतच पाऊस कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. (rainfall pattern has changed but farmers crop pattern was not changed jalgaon news)

यामुळे शेतकरी चिंतेत आहे. पाऊस कमी झाला, म्हणून पर्यायी पिकांचा विचार करावा, असा विचार शेतकरी करतात. मात्र, नगदी पीक म्हणून कापूस, केळी हीच पिके जिल्ह्यात आहेत. त्याशिवाय इतर पिकांचा विचार शेतकरी करू शकत नसल्याचे चित्र आहे. पावसाचा पॅटर्न बदलला. मात्र, पीक पॅटर्न बदलेनासा झाला आहे.

जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाचे आहेत. १५ ते २० वर्षांपूर्वी या महिन्यातच पाऊस भरपूर पडायचा. सलग सात दिवस पावसाची झडी असायची. मात्र, पाच ते दहा वर्षांपासून ग्लोबल वॉर्मिंगमुळे ‘कधी अतिवृष्टी, तर कधी अवकाळी, तर कधी दुष्काळ’, असे चित्र असते. जून, जुलैमध्ये पाऊस पेरण्यायोग्य पडत नाही.

नंतर मात्र भरपूर पडतो. तोपर्यंत पावसाळ्याचे दोन महिने निघून गेलेले असतात. ऐन दिवाळीत पाऊस पडतो. डिसेंबर, जानेवारीपर्यंत पाऊस सुरू असतो. मध्येच अतिवृष्टीचा तडाखा देत हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो. यंदा मार्चमध्ये दोनवेळा अवकाळीचा तडाखा बसला. सध्याही अवकाळीचा प्रकोप सुरूच आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

यंदा राज्यात ‘अल निलो’मुळे तापमानात वाढ, पाऊस कमी व उशिराने येण्याचा अंदाज आहे. पाऊस जुलैनंतर पडेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. पाऊस दोन महिने उशिरा सुरू झाल्याने शेतकरी पिकांच्या पद्धतीत बदल करतील काय? याबाबत कृषी विभागाला विचारले असता, आपल्याकडे कापूस, केळी ही नगदी पिके आहेत. यंदा कापसाला कमी भाव असला, तरी काही प्रमाणात कापूस पेऱ्यात घट होईल. मात्र, कापूस पेरला जाईल. पाऊस उशिरा झाला, तरी कापसाचा पेरा खरिपात होईल.

पर्यायी नगदी पीक नाही

इतर नगदी पिकांमध्ये सूर्यफूल, बाजरी, तूर, एरंडीचा समावेश आहे. मात्र, शेतकरी ही पिके मोठ्या प्रमाणावर पेरणार नाहीत. जो भाव कापसाला मिळतो, तो या पिकांना मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी उशिराने पेरण्या करतील. मात्र, खरिपात कापूसच पेरतील, असे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

आकडे बोलतात...

-गेल्या वर्षीचा खरीप हंगाम : सात लाख ५० हजार हेक्टर

-गेल्या वर्षीची कापूस पेरणी : पाच लाख ७० हजार

-यंदा होणारी संभाव्य कापूस पेरणी : पाच लाख ५० हजार

"पावसाने ‘पॅटर्न’ बदलला, तरी जळगाव जिल्ह्यात शेतकरी पीकपद्धतीत बदल करणार नाहीत. खरिपातील कापूस, तूर, मूग, मका ही पिके आहेत. त्यातील कापूस नगदी व मोठ्या प्रमाणात घेतले जाणारे आहे. इतर पिकांना मोठ्या प्रमाणात शेतकरी घेणार नाही. पाऊस उशिरा झाला, तरी कापूसच पेरतील. त्याचे प्रमाण कमी असेल." -संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Kurla Complex Metro Station वर मोठी घटना! सुमारे 40-50 फूट खोलवर लागली आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

SCROLL FOR NEXT