जळगाव

रावेर तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा; तीनशे हेक्टर क्षेत्र बाधित 

प्रदिप वैद्य

रावेर : तालुक्यात शनिवारी रात्री अचानक वादळी पावसाच्या तडाख्यामुळे केळीसह मका व गव्हाचे सुमारे साडेचारशे शेतकऱ्यांच्या तीनशे हेक्टर क्षेत्रातील पिकांचे सुमारे सात कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी व महसूल विभागातर्फे सादर करण्यात आला. यात सर्वाधिक सव्वासहा कोटी रुपयांची केळी झाडे जमीनदोस्त होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले. 


तालुक्यात शनिवारी रात्री सात ते आठच्या सुमारास जोरदार वादळी पावसाचा तालुक्याला तडाखा बसला. महसूल व कृषी विभागाने सोमवारी पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल सादर केला. त्यानुसार तालुक्यातील २९ गावांतील २६० शेतकऱ्यांच्या १५५.९० हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे सहा कोटी २३ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. तर ३१ गावांतील २०५ शेतकऱ्यांच्या १४५.१६ हेक्टर क्षेत्रातील मका पिकाचे ७२ लाख ५८ हजार रुपयांचे नुकसान झाले. तर एका गावातील २.५० हेक्टर क्षेत्रातील तीन शेतकऱ्यांच्या गहू पिकाचे १२ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. असे ४६८ शेतकऱ्यांच्या ३०३.५६ हेक्टर क्षेत्रातील केळी, मका, गहू या पिकांचे एकूण सहा कोटी ९७ लाख ४३ हजार रुपयांचे नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी व महसूल विभागातर्फे वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT