Raksha Khadse News : भारतीय जनता पक्षाने रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास आपण निवडणूक लढविणार आहोत. कौटुंबिक संबंध असले, तरी आपण सासरे एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध लढण्याची परिस्थिती स्वीकारणार आहोत, असे मत खासदार रक्षा खडसे यांनी बुधवारी (ता. १३) माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी, पक्षाने आपल्याला उमेदवारी दिल्यास रावेर लोकसभा मतदारसंघातून लढण्यास तयार असल्याचे मत व्यक्त केले आहे.
या मतदारसंघात त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे खासदार आहेत. (raksha khadse statement about election against Eknath Khadse jalgaon news)
त्यांना भाजपतर्फे तिसऱ्यांदा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यातच त्यांना जर त्यांच्या पक्षाने उमेदवारी दिली, तर त्या तिकडून लढतील. त्यामुळे आम्ही विरोधी लढू, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता रावेर मतदारसंघात सासऱ्याविरुद्ध सून अशी लढत होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
ायाबाबत खासदार खडसे म्हणाल्या, की भाजपने मला रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीची संधी दिली, तर मी नक्कीच लढण्यास तयार आहे. दहा वर्षांपासून खासदार म्हणून रावेर लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहे.
सासरे एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आणि मला भाजपने उमेदवारी दिली, तर आम्ही दोघेही या परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहोत. नऊ वर्षांपासून आपण मतदारसंघात चांगले काम केलेले असल्याने आपण निश्चित त्या जबाबदरीला न्याय देण्यास समर्थ आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
कौटुंबिक लढतीची अनेक उदाहरणे
देशात घरातील राजकीय कौटुंबिक लढती अनेक निवडणुकांमध्ये झाल्या आहेत. त्यामुळे जी परिस्थिती असेल, त्याला सामोरे जाण्याची आपली तयारी आहे. मला भाजपसोबत काम करायचे आहे. कौटुंबिक संबंध राहतीलच. मग बरेच लोक म्हणतील, तुम्ही इकडे वेगळे दाखविता आणि तिकडे वेगळे दाखविता; परंतु आपले सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत.
शेवटी आपल्या वैयक्तिक मताचाही प्रश्न असतो. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार घेऊन पुढे जायचे आहे. तेच काम मी करीत आहे. नाथाभाऊ तिकडे गेले, तर ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्यांच्या मतानुसार ते तिकडे काम करीत आहेत.
परंतु माझे पती (कै.) निखिल खडसे यांचे निधन झाल्यानंतर नाथाभाऊंनीच आपल्याला निवडणुकीसाठी उभे केले होते. त्यांचा आशीर्वाद, मार्गदर्शनाचा आपल्याला राजकारणात फायदा झाला आहे. परंतु येणारी राजकीय परिस्थिती त्यांनाही स्वीकारार्ह आहे आणि मलाही आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.