MLA Kishor Patil while understanding development plan of Ram Mandir premises. esakal
जळगाव

Jalgaon Ram Mandir : अयोध्येच्या धर्तीवर पाचोऱ्यात साकारणार राम मंदिर; अंतिम आराखडा मंजूर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Ram Mandir : येथील हिवरा नदीकाठी असलेल्या प्राचीन व जागृत देवस्थान असलेल्या राम मंदिर परिसराला आता पर्यटन स्थळ विकास योजनेंतर्गत देखणे रूप प्राप्त होणार असून, यासाठी दहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. (Ram temple premises will now get new look under tourist destination development scheme pachora jalgaon news)

या मंदिर परिसर विकासाचा अंतिम आराखडा आमदार किशोर पाटील यांनी मंजूर केला असून, येत्या जून महिन्यापासून प्रत्यक्ष कामास सुरवात होणार असल्याने भाविक व पाचोरावासी आनंदले आहेत. अयोध्येच्या धर्तीवर हे मंदिर साकारले जाणार आहे.

हिवरा नदीकाठी राम मंदिराचा भव्य परिसर आहे. या परिसरात राम मंदिरासह हनुमान मंदिर, महादेव मंदिर ,गोशाळा, व्यायाम शाळा व काही शेती असून, हा परिसर भाविकांसाठी श्रद्धास्थान ठरला आहे.

मुख्यमंत्री होण्याअगोदर एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी येऊन पुरोहित गजानन जोशी यांच्या मंत्रोच्चारात काही विधी व ग्रहशांतीही केली होती. या ठिकाणी राम नवमी, हनुमान जयंती, आषाढी व कार्तिकी एकादशीचे उत्सव साजरे होतात. त्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

या भव्य व धार्मिक परिसराचा विकास व्हावा, यासाठी आमदार किशोर पाटील यांनी शासन दरबारी प्रस्ताव सादर करून निधीसाठी पाठपुरावा चालवला होता. त्या आधारे पर्यटन विकास योजनेंतर्गत राम मंदिर परिसर विकासासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, आणखी वाढीव निधीची अपेक्षा आहे.

अयोध्या येथील राम मंदिराच्या धर्तीवर येथे भव्य दिव्य मंदिर साकारणार असून, मंदिराच्या चारही बाजूला पाणी व विविध विधिसाठी घाट, नदीवर पूल, मंदिर परिसरात प्रशस्त प्रदक्षिणा मार्ग, पूजा विधीची जागा, गोशाळा, बगीचा, बालकांसाठी खेळणी, वयोवृद्धांसाठी आरामदायी बसण्याची व्यवस्था, खुली जिम, व्यायाम शाळा, प्रशस्त पार्किंग, लॉन व खुले सभागृह, हॉटेल, सर्व परिसरात फिरता येईल, असे प्रशस्त रस्ते अशा सर्व सुविधा साकारल्या जाणार आहेत.

या परिसर विकासासाठीचा आराखडा वास्तु विशारद सुजित वर्मा यांनी तयार केला असून, त्याचे अवलोकन करून आमदार किशोर पाटील यांनी त्यास मंजुरी दिली आहे. आमदार किशोर पाटील, सुजित वर्मा, अभियंता डी. एम. पाटील, एमएसपी ‘बिल्डकॉन’चे मनोज पाटील, स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांनी मंदिर परिसराची पाहणी करून श्री. वर्मा यांनी केलेला आराखडा समजावून घेऊन त्यास तत्काळ मंजुरी दिली आहे. येत्या जून महिन्यात कामास प्रत्यक्ष सुरवात होणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ते पुन्हा आले! US Presidential Election मध्ये शानदार विजय, पहिल्याच भाषणात Donald Trump काय म्हणाले?

Vicky Kaushal : विकी कौशलने घेतला पुष्पा 2चा धसका ; छावाची रिलीज डेट बदलणार ?

Latest Marathi News Updates live : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निकाल आता पुढच्या वर्षात येण्याची शक्यता

Share Market Closing: सेन्सेक्स 900 अंकांनी वाढला; निफ्टी 24,500 च्या जवळ, ट्रम्प यांच्या विजयामुळे आयटी शेअर्स तेजीत

भ्रष्ट नेत्यांनाच पुन्हा तिकीट का देता? नाना पाटेकरांचा थेट सवाल; फडणवीसांच्या उत्तराने उंचावतील भुवया

SCROLL FOR NEXT