Jalgaon News : भारतासह संपूर्ण जगात शांती, सुख लाभू दे. चांगले काम करण्याची सुबूद्धी दे. अशी प्रार्थना शनिवारी (ता. २२) मौलाना उस्मान कासमी यांनी रमजान इदनिमित्ताने इदगाह मैदानावर केली. हजारोंच्या संख्येने उपस्थित जनसमुदायाने त्यास आमीन म्हणून अनुमोदन दिले. (Ramzan Eid 2023 Mass prayer on Ramadan Eid jalgaon news)
जळगाव शहरातील अजिंठा चौक येथील मुस्लिम कब्रस्तान व इदगाह ट्रस्टच्या मैदानावर ईदची नमाज अदा करण्यात आली. या वेळी शहरातील सुमारे पंधरा हजार बांधव उपस्थित होते.
ट्रस्टचे अध्यक्ष वहाब मलिक यांनी रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. शहर ए काजी मुफ्ती अतिकुर्रहेमान यांनी उर्दूतून प्रवचन दिले. त्यात त्यांनी इस्लाम धर्माचे मानवतेबद्दल असलेले स्पष्ट आदेश कथन केले. आज या देशाला समानता व बंधूभावाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी एका वर्षाच्या संक्षिप्त आढाव्याद्वारे सुमारे १८ लाख रुपयांचा जमाखर्च सादर करून ट्रस्टच्या भावी योजनांबद्दल माहिती दिली.
मौलाना उस्मान कासमी यांनी नमाज अदा केली. त्यानंतर दुवा करून त्यांनी अरबी खुतबा प्रवचन सादर केले. ट्रस्टचे सहसचिव अनिस शहा यांनी सूत्रसंचालन केले. ट्रस्टचे दुसरे सहसचिव मुकीम अहमद यांनी आभार मानले. नमाजनंतर सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
प्रशासनातर्फे शुभेच्छा
जिल्हा पोलिस अधीक्षक एस. राजकुमार, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित, एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपअधीक्षक कुलकर्णी आदींनी प्रत्यक्ष ईदगाह मैदानावर उपस्थित राहून सर्व मुस्लिम समाज बांधवांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
मुस्लिम ईदगाह ट्रस्टचे रियाज मिर्झा, ताहेर शेख, ॲड. सलीम शेख, शरीफ पिंजारी, बादलीवाला, रेहान खाटीक, माजी अध्यक्ष करीम सालार, एजाज मलिक, रहीम मलिक, माजी सचिव अमीन बादलीवाला, सय्यद चांद, डॉ. जावेद, प्रो. डॉ. एम. इकबाल, जफर शेख, नुर बेलदार, आरिफ देशमुख, रागिबअहमद आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.