rate of two wheeler driving by minor boys and girls in age group of 13 to 18 has increased jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकीच्या चाव्या; वाहतूक पोलिसांची बघ्याची भूमिका

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरात १३ ते १८ वयोगटातील अल्पवयीन मुला-मुलींकडून दुचाकी चालविण्याचे प्रमाण कमालीचे वाढले असून, यामुळे अपघातांना आमंत्रण दिले जात आहे.

पोलिसांनी यावर कठोर पाऊले उचलण्याची गरज असताना त्यांच्याकडून मात्र बघ्याची भूमिका घेतली जात असल्याचे चित्र आहे. पालकांनी देखील याबाबत सजग होण्याची गरज आहे.

ऐन पावसाळ्यात शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असतानाच छोट्या-मोठ्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे. (rate of two wheeler driving by minor boys and girls in age group of 13 to 18 has increased jalgaon news)

यात प्रामुख्याने अल्पवयीन शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच इतर मुला-मुलींचे भरधाव वेगाने दुचाकी चालविण्याचे प्रमाण वाढले असून, यामुळे मात्र अपघातांना आमंत्रण दिले जात असल्याचे सर्वसामान्य जनतेचे मत आहे.

वाहतूक पोलिसांनी कठोर पावले उचलून या अल्पवयीन मुला-मुलींना तसेच त्यांच्या पालकांना या बाबतीत जागरूक करणे गरजेचे असून, या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केल्याने याला आळा बसू शकतो. शहरातील मुख्य रस्त्यांवर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्याने अपघातांना आळा बसू शकतो.

दुपारी ११ ये १२ च्या दरम्यान सकाळ विभागातील शाळा सुटण्याच्या वेळी बसस्थानक परिसर तसेच स्वामी समर्थ मंदिराकडे जाणाऱ्या चौफुलीवर विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या ठिकाणी रोजच छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटना घडत असतात.

बुलेटच्या फायरिंगचा सर्वसामान्यांना त्रास

काही हौशी बुलेटचालकांनी बुलेटच्या फायरिंगमध्ये बदल करून बंदुकीतून सुटणाऱ्या गोळीचा ज्या प्रकारे आवाज येतो त्या आवाजाची फायरिंग बसविली आहे. जोरात नेणाऱ्या बुलेटच्या फायरिंगमधून अचानक आवाज निघाल्याने सर्वसामान्यांना मात्र त्रास होतोय. पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची गरज आहे.

कायदा काय सांगतो

परवाना नसलेल्या व अल्पवयीन मुलांना दुचाकी चालवण्यापासून प्रतिबंध करणे व पालकांचे समुपदेशन करण्याच्या सूचना नवीन मोटार वाहन कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे १८ वर्षांखालील मुले दुचाकी चालवताना आढळून आल्यास पालकांना २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

१८ वर्षांखालील कोणत्याही मुलांनी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहन चालवू नये, असा नियम आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अल्पवयीन मुलांना दुचाकी चालविण्यापासून पालकांनी प्रतिबंध करावे. तसेच त्यांच्या पालकांचे समुपदेशन करावे, तरीही नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्त यांनी दिले आहेत.

शहरातील गलवाडे रस्ता, मारवड रस्ता व ढेकू रोड परिसरात काही शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून बाईक रेसचे आयोजन करण्यात येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. १०० ते १५० च्या वेगाने बाईक चालवून स्वतः व दुसऱ्याला देखील अपघाताचे आमंत्रण हे दुचाकीस्वार देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT