Speaking at the press conference, Mayor Ananda Patil. Neighboring corporator.  esakal
जळगाव

Jalgaon News : राष्ट्रवादीचे आरोप शिवसेना नगराध्यक्षांनी फेटाळले

शहरातील नगरपंचायत हद्दीत विकासकामांवरून विरोधी बाकावरील राष्ट्रवादी व सत्ताधारी शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील नगरपंचायत हद्दीत विकासकामांवरून विरोधी बाकावरील राष्ट्रवादी व सत्ताधारी शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. नगराध्यक्षांवर निशाणा साधत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या प्रभागातील कामे स्थायी समितीवर घेण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप साखळी उपोषणात करण्यात आला.

याबाबत सत्ताधारी नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी पत्रकार परिषद घेऊन लेखी पुरावे सादर करीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची पोलखोल करीत आरोप फेटाळून लावले. (recrimination between opposition nationalists and ruling Shiv Sena over development works within city municipal panchayat limits jalgaon news)

शासकीय विश्रामगृहात रविवारी (ता. ४) दुपारी बाराला पत्रकार परिषद पार पडली. या वेळी नगराध्यक्ष आनंदा पाटील यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. नगराध्यक्ष पाटील म्हणाले, की पाणीपुरवठा योजनेला महिनाभरात तांत्रिक मान्यता मिळणार आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी साडेचार वर्षांच्या कारकिर्दीत सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याने विरोधकांनी याचा धसका घेतला आहे. सत्ताधारी शिवसेनेने लेखी ठरावाचे पुरावे दिल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची पंचायत होत आहे.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सुशोभिकरणासाठी ३० लाख निधी मंजूर असून, त्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक कडुसिंग पाटील उर्फ भरत आप्पा, नगरसेवक योगिता खेवलकर, सय्यद सइदाबी रशीद, नगरसेविका पूजा पारधी, नगरसेविका एकता निंबोळकर, नगरसेवक जफर शेख, मुजम्मील शाह अशा सात नगरसेवकांनी ठरावात लेखी विरोध दर्शविला आहे.

या पाठोपाठ भिल्ल समाजासाठी ५० लाख निधी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झाला असून, त्यासाठी राष्ट्रवादीच्या सात नगरसेवकांनी ठरावात लेखी विरोध दर्शविला. भोई समाजासाठी प्रभाग क्रमांक एकमध्ये योगा हाॅल बांधकामासाठी ५० लाखांचा निधी मंजूर आहे. या कामाला राष्ट्रवादीच्या सात नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे.

वाणी समाज स्मशान भूमी कंपाउंडसाठी सात नगरसेवकांनी लेखी विरोध दर्शविला आहे. प्रभाग क्रमांक १३, १६, १७, १५, १२ या प्रभागातील नागरिक वापर करीत असलेल्या म्हसोबा मंदिराजवळील माॅडेल शौचालयाच्या कामासाठी राष्ट्रवादीच्या सात नगरसेवकांनी ठरावात लेखी विरोध दर्शविला आहे.

रेणुका देवी माता मंदिर सुशोभिकरणासाठी विरोध दर्शविण्यात आला आहे. वरील विषय सत्ताधारी शिवसेनेकडून मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. या ठरावाला लेखी विरोध राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दर्शविला आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोधी राष्ट्रवादी नगसेवकानी ११ एप्रिल २०२२ ला झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्व विकासकामाच्या सर्व ठरावाला विरोध लेखी दर्शविला आहे आणि आम्ही शहराच्या विकासाला खीळ बसवत आहे, असे विरोधकांकडून रेटून खोटे बोलले जात आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी साडेचार वर्षांत नगरपंचायतीसाठी २३ ते २४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती देखील नगराध्यक्ष पाटील यांच्यासह नगरसेवकांनी यावेळी दिली. या वेळी नगरसेवक सईद बागवान, विजय बडगुजर, दिनेश माळी, गोलू बरडिया, हर्षल बडगुजर, नीलेश माळी, शांताराम कोळी यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT