bhusawal railway station esakal
जळगाव

Bhusawal Railway Station : भुसावळ रेल्वेस्थानकात ‘पुनर्विकास’ कामांना सुरवात; स्थानक होणार आणखी स्वच्छ अन्‌ सुंदर

सकाळ वृत्तसेवा

Bhusawal Railway Station : भुसावळ रेल्वे विभागातर्फे आरटीसी बसस्थानक ते भुसावळ रेल्वेस्थानक (दक्षिण बाजू)दरम्यानचे खुले अंतर सीमाभिंत वाढवून बंद करण्यात येत असून, त्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे.

भुसावळ विभागात मोठ्या सुधारणा, पुनर्विकास कामासाठी एकूण पाच प्रमुख स्थानके निवडण्यात आली आहेत. त्यात नाशिक, भुसावळ, अकोला, अमरावती, खंडवा यांचा समावेश आहे. अमृत भारत स्टेशन विकास योजनेसाठी निवडलेल्या अन्य १५ स्थानकांव्यतिरिक्त ही पाच स्थानके आहेत.

भुसावळ स्थानकाच्या दक्षिण आणि उत्तरेकडील दोन्ही बाजूंना विस्तीर्ण परिभ्रमण क्षेत्रासारखी प्रमुख अपग्रेडेशन कामे नियोजित आहेत. (Redevelopment work started at Bhusawal railway station Jalgaon News)

प्रशस्त पार्किंगबरोबरच स्वतंत्र प्रवेश आणि बाहेर पडण्याचे द्वार, लँडस्केपिंग, बाउंड्री वॉल, एन्ट्री पोर्च, नवीन लिफ्ट, एस्केलेटर, मानक चिन्हे, कोच इंडिकेटर आदींचा त्यात समावेश आहे.

सध्या बसस्थानकाच्या बाजूने अवैध फेरीवाले स्थानक परिसरात प्रवेश करतात आणि उपद्रव निर्माण करतात. अनुचित घटना घडण्याचीही शक्यता असते. बसस्थानक परिसरातील अनधिकृत दुकाने आणि रेल्वेस्थानक परिसरात बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या उपद्रवामुळे प्रवाशांच्या सुरळीत वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आणि त्यांच्या हालचालींना अडथळा निर्माण होतो.

स्वच्छतेचा प्रश्‍न

बसस्थानक परिसरातील या दुकानांवर बंदी असलेला गुटखाही ग्राहकांना बेकायदेशीरपणे विकला जात असल्याने बसस्थानक व रेल्वेस्थानक परिसरात नागरिक गुटखा खाऊन थुंकत असल्याने स्वच्छतेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. सीमाभिंत नसल्याने प्रवासी, नागरिक गुटख्यासारख्या बंदी असलेल्या वस्तू खरेदीसाठी बसस्थानक परिसरातून रेल्वेस्थानक परिसरात ये-जा करतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आरपीएफ दलाची उपस्थिती

स्थानकाच्या सुंदर आणि सौंदर्यपूर्ण स्वरूपासाठी दीर्घकालीन स्थानक पुनर्विकास नियोजनाचा एक भाग म्हणून, भुसावळ स्थानकाच्या दक्षिण बाजूला रेल्वे आणि बसस्थानक परिसरात सीमा भिंत बांधण्याचे काम सुरू झाले. या कामास काहींचा प्रतिकार आणि काही लोकांकडून अडथळा येत असल्याने आरपीएफ दलाच्या उपस्थितीत काम सुरू झाले.

सुधारणांसाठी कटिबद्ध

रेल्वे प्रशासनाकडून अतिक्रमण आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भुसावळ आणि जळगाव येथे सर्व अनधिकृत प्रवेश बंद करण्याची योजना आखली आहे. प्रवासी सुविधा वाढविण्यासाठी मध्य रेल्वे स्थानकांच्या आधुनिक स्वरूपासह हळूहळू सुधारणा करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे रेल्वेतर्फे देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections साठी MNSची जय्यत तयारी; मुंबईत पुन्हा राज ठाकरेंची तोफ धडाडणार! 'या' दिवशी होणार सभा

Haryana Assembly: हरियाणात विजय मिळाल्यास, काँग्रेसला 'या' पाच मुद्यांवर 'बूस्टर' मिळणार

Akola Violence: अकोल्यात तणाव! दोन गटात राडा, जमावाने दगडफेक करुन कार पेटवल्या

Singham Again Trailer Launch : "माझी लेक बेबी सिंबा" ; सिंघमच्या ट्रेलर लाँचला रणवीरने केलं लेकीचं कौतुक , बायकोविषयी म्हणाला...

Rahul Gandhi Video: दलितांच्या घरात काय बनतं? राहुल गांधींनी जाणून घेतली खाद्यसंस्कृती, कोल्हापुरात स्वतः बनवलं जेवण

SCROLL FOR NEXT