Collector Ayush Prasad and others while distributing healthy food esakal
जळगाव

Jalgaon News: HIV बधितांचे पुनर्वसन प्रशासन करणार : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : एचआयव्ही बाधितांचे मतदारयादीत नाव‌ असल्याची खात्री प्रशासन करत आहे. प्रत्येकाला अन्नधान्याच्या रूपाने वेळेवर रेशन सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. एचआयव्ही बाधितांच्या पुनर्वसनासाठी प्रशासन कटिबद्ध असून, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी (ता. २) येथे दिली.

सेवारथ परिवाराच्या वतीने एचआयव्ही बाधित बालक, महिला व पुरुषांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सकस आहाराचे वाटप करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

सेवारथ परिवाराचे दिलीप गांधी, डॉ. नीलिमा सेठिया, डॉ. रितेश पाटील, नयनतारा बाफना आदी उपस्थित होते. (Rehabilitation of HIV sufferers will be administered Collector Ayush Prasad Jalgaon News)

जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले, की एचआयव्ही बाधितांनी संकटात खचून न जाता धीरोदात्तपणे आजाराचा सामना केला पाहिजे. आरोग्यमय जीवनशैलीचा अंगीकार केला, तर एचआयव्ही पॉझिटिव्ह निरोगी माणसासारखे आयुष्य जगू शकतात.

संकटात शासन आणि सामाजिक संस्था आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहे. मात्र आपण स्वावलंबी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. यात आपल्याला नक्कीच यश मिळेल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

श्री. प्रसाद म्हणाले, एचआयव्ही बाधितांना सामाजिक भेदभावाचा करावा लागणारा सामना अत्यंत वेदनादायी आहे. भेदभाव करणाऱ्यांचे समुपदेशन करण्याची गरज आहे.

वंदना पवार यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप गांधी, डॉ. नीलिमा सेठिया यांनी सेवारत संस्थेच्या कार्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT