Anil Patil Akkalpada dam esakal
जळगाव

Jalgaon News: अक्कलपाडा धरणातून ‘पांझरा’त आवर्तन सोडा! मंत्री अनिल पाटील यांच्या धुळे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

अमळनेर मतदारसंघातील पांझरा नदी काठच्या १६ ते १७ गावांच्या पाणीपुरवठा योजना या पांझरा नदीपात्रात आहेत.

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : तालुक्यातील पांझरा नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात आवर्तन सोडण्यात यावे, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. (Release circulation from Akkalpada Dam to Panzara Minister Anil Patil instructions to Dhule District Collectors Jalgaon News)

याबाबत मंत्री अनिल पाटील यांची अमळनेर बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव जिल्हा उपाध्यक्ष गौरव उदय पाटील मुडी प्र.डांगरी, रामराव हरचंद पाटील भरवस, गणेश भामरे, विजय लोटन पाटील, जगदीश पाटील बाम्हणे, साहेबराव पाटील एकतास, उदय पाटील, प्रणव पाटील, गुणवंत पाटील मुडी, सोनु संदानशिव सरपंच बोर्दडे, संतोष चौधरी, राजू पाटील, विकास पाटील बोर्दडे, कैलास पाटील, सरपंच लोण बु., प्रफुल्ल पाटील एकलहरे, सर्जेराव पाटील खर्दे, सुनील पवार गलवाडे यांच्यासह कळंबू, भिलाली, शहापूर, तांदळी, मांडळ, भरवस, पाडसे, खेडी, वासरे, लोण ग्रुप गाव येथील ग्रामस्थ मंडळी यांनी भेट घेऊन सद्यस्थिती मांडत आवर्तन सोडण्याची मागणी केली होती.

त्यानुसार मंत्री अनिल पाटील यांनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. यात म्हटले आहे, की अमळनेर मतदारसंघातील पांझरा नदी काठच्या १६ ते १७ गावांच्या पाणीपुरवठा योजना या पांझरा नदीपात्रात आहेत.

पांझरा नदीपात्रात पाणी नसल्यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी कोरड्या पडत आहेत. अमळनेर तालुका दुष्काळी असल्याने पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भासण्याची शक्यता आहे. तरी अक्कलपाडा धरणातून लवकरात लवकर आवर्तन सोडण्यात यावे, अशा सूचना मंत्री पाटील यांनी केल्या आहेत.

‘हतनूर’मधून आवर्तन सोडले

भुसावळ शहरवासीयांची पाण्याची चिंता मिटली असून, नुकतेच हतनूर धरणातून आवर्तन सोडण्यात आले आहे. रविवारी पहाटे बंधाऱ्यात हे आवर्तन सोडण्यात आले आहे.

रविवारी पहाटे बंधाऱ्यात हे आवर्तन पोहोचले असून, त्यामुळे शहरवासीयांना टंचाईचच्या झळा आता जाणवणार नाहीत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदीपात्रातील बंधाऱ्याची जलपातळी घसरल्यानंतर हतनूर धरणातून रविवारी आवर्तन सोडण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT