land Acquisition esakal
जळगाव

Jalgaon News: भूसंपादनाचा पावणेचार कोटींचा मोबदला; शेतकऱ्यांनी मानले पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांचे आभार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून २००८ मध्ये जिल्ह्यातील भडगाव, एरंडोल व पारोळा तालुक्यातील नद्या व कालवे जोडून भूजल पातळी वाढवण्यासाठीचे काम मंजूर करण्यात आले होते. या कामात जमीन संपादन झालेल्या १४३ शेतकऱ्यांना २०१८ मध्ये पन्नास टक्के मोबदला रक्कम मिळाली होती.

त्यानंतर पाच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ३ कोटी ७४ लाख ९२ हजारांची उर्वरित मोबदला रक्कम मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता. शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत आभार मानले. (remaining land acquisition compensation amount of 3 crore 74 lakh will get farmer jalgaon news)

जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून भडगाव (जुवार्डी, आडळसे, पथराड, गुढे), एरंडोल (गालापूर) व पारोळा (पळासखेडे सिम, नगांव, मंगरूळ, मोरफळ) तालुक्यातील ६ नदीजोड योजनांसाठी १४३ शेतकऱ्यांच्या २००८ पासून लघू पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून जमीन संपादन करण्यात आल्या होत्या.

निधी ‍वितरित न झाल्याने शेतकऱ्यांना लाभ मिळणे प्रलंबित होते. याबाबत याभागातील शेतकऱ्यांनी आमदार किशोर पाटील यांच्यामाध्यमातून पालकमंत्री पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विषयात लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या सूचना केल्या होत्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी लघू पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे व जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांच्याकडून शेतकऱ्यांचा विषय समजून घेतला. २९ मार्च २०२३ ला याबाबत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वितरणात काही अडचण नव्हती. जिल्हाधिकाऱ्यांनी १ नोव्हेंबर २०२३ ला निधी वितरणाचे आदेश दिले. त्यानुसार शेतकऱ्यांना आता त्यांच्या खात्यावर दिवाळीच्या आधी मोबदला रक्कम मिळणार आहे.

"पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील यांनी केलेला पाठपुरावा व जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मक भूमिका यामुळे आम्हाला अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर उर्वरित मोबदला रक्कम मिळाली आहे." - उत्तम पाटील, शेतकरी, गुढे (ता. भडगाव)

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार किशोर पाटील यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा, पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या सूचनांमुळे पंधरा वर्षाच्या संघर्षानंतर आम्हा शेतकऱ्यांच्या खात्यात शंभर टक्के मोबदला रक्कम दिवाळीच्या आधी मिळणार आहे. यापेक्षा दुसरा मोठा आनंद नाही" - रमेश पाटील, शेतकरी, रा. जुवार्डी (ता.भडगाव)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT