rickshaw business is now in trouble as fares are less than expected during day esakal
जळगाव

Jalgaon News : इंधन दर, स्पर्धा वाढली, भाडे मात्र पूर्वीचेच; रिक्षाचालकांच्या व्यथा...!

समीर तडवी

Jalgaon News : शहरातील अनेक कुटुंब रिक्षा व्यवसायावर अवलंबून आहेत. अलीकडच्या काळात रिक्षांची संख्या शेकडोच्या घरात गेली आहे. रिक्षांची संख्या कमी असताना पेट्रोल व घरखर्च या व्यवसायातून सहज निघत होता. (rickshaw business is now in trouble as fares are less than expected during day jalgaon news)

मात्र आता रिक्षांची संख्या वाढल्याने वाहनधारकांना आता लवकर भाडे मिळत नाही. त्यात एसटीत महिलांना ५० टक्के सवलत असल्याने प्रवाशांची संख्या रोडावली आहे. परिणामी, दिवसभरात अपेक्षेपेक्षा कमी भाडे मिळत असल्याने रिक्षा व्यवसाय आता अडचणीत सापडला आहे. त्यामुळे रिक्षाचालक व मालकांपुढे अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. शासनाने त्यासाठी आर्थिक साहाय्य करावे, अशी मागणी रिक्षाधारकांकडून होत आहे.

फैजपूर शहर हे यावल-रावेर तालुक्यातील मध्यंतरी व महत्त्वाचे शहर आहे. शहरातून अंकलेश्वर -बऱ्हाणपूर महामार्ग गेल्याने तसेच यावल, रावेर, भुसावळला जोडणारे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे एक वेगळे महत्त्व प्राप्त शहर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. शहराचा अल्पकाळात झालेला विस्तार व वाढती लोकसंख्येमुळे बाजारपेठ, औद्योगिक विकास, शैक्षणिक संस्था व सहकारी संस्थाची निर्मिती झाली.

शहरात सर्व सोयीसुविधा उपलब्ध असल्याने लहान मोठ्या व्यवसायाची जोड मिळाली आहे. फैजपूर येथील बस्थानकाजवळ असलेल्या रिक्षा थांबापासून कारखाना, न्हावी, मारुळ, हंबर्डी तर छत्री चौक व सुभाष चौक रिक्षा थांबापासून सावदा अशा ठिकाणी रिक्षाने प्रवासाची सुविधा आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

या तिन्ही रिक्षा थांब्यावर जवळपास दोनशेपेक्षा जास्त रिक्षाची संख्या आहे. शहराचा विचार केला असता दिवसाला दीडशे, दोनशे रिक्षा धावतात व रिक्षा व्यवसायापासून शहरातील दोन-अडीचशे कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत आहे.

धावाधावनंतरही अडीचशे, तीनशेच...

तासंतास प्रवाशांची प्रतीक्षा करावी लागते. थांब्यावर रिक्षांची रांग लागलेली असते. दोन, तीन तासांनंतर एकाचा नंबर लागतो. त्यात पुरेसे प्रवासी मिळविण्यासाठी आणखी वेळ घालवावा लागतो.

त्यातही योग्य भाडे मिळाले नाही तर मिळणाऱ्या भाड्यापैकी निम्मे भाड्यावरही समाधान मानावे लागते. सकाळपासून रात्रीपर्यंत रिक्षाचालकांना अडीच, तीनशे रुपयांवर समाधान मानावे लागते, अशा भावना रिक्षाचालकांनी व्यक्त केल्या आहेत.

"सुभाष चौक रिक्षा थांब्यावर ५० रिक्षा आहेत. त्यामुळे दोन, तीन तासांनंतर दिवसभरात फैजपूर ते सावदा रांगेत उभे राहिल्यानंतर केवळ दोन फेऱ्या मिळतात. सकाळपासून तर रात्रीपर्यंत दोन, अडीचशे रुपये मिळतात."- अनिस शेख, रिक्षाचालक

"पेट्रोलचे भाव वाढले आहेत. फैजपूर-सावदा अंतर तीन किलोमीटर आहे. दहा रुपये भाडे मिळते. गावातील फेरा मिळाला तर वीस-तीस रुपये मिळतात. त्यात निम्म्यापेक्षा जास्त पेट्रोलवर खर्च होतो. आठवडे बाजाराच्या दिवशी रिक्षा व्यवसायातून दररोजपेक्षा दोन पैसे जास्त मिळतात, एवढेच समाधान." - मोहिद्दीन शेख, रिक्षाचालक

"पेट्रोलचे भाव वाढत चालले आहे. रिक्षाभाडे वाढत नाही. त्यात रिक्षांची संख्या वाढत चालली आहे. दोनशे, तीनशे रुपये कमविण्यासाठी एकमात्र रिक्षा व्यवसाय पंधरा वर्षांपासून असल्याने दुसरा व्यवसाय करता येत नाही." - मजित तडवी, रिक्षाचालक

"पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले. त्यातच महिलांना एसटीमध्ये अर्धे भाडे असल्याने रिक्षा व्यवसाय अडचणीत आला. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले आहे" - संजय सोनवणे, रिक्षाचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT