Risk of cervical cancer in women after breast cancer 
जळगाव

Cervical Cancer : स्तन कॅन्सरनंतर महिलांत ‘सर्वाइकल कॅन्सर’चा धोका, ही आहेत कारणे

बदललेली जीवनशैली, दैनंदिन आहारात वाढलेले जंक फुडचे प्रमाण, व्यायाम व आरोग्याबाबत उदासीनता अशा कारणांमुळे महिलांमध्ये सर्वाइकल कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. स्तनांच्या कॅन्सरनंतर महिलांमध्ये या कॅन्सरचे प्रमाण क्रमांक दोनवर आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : बदललेली जीवनशैली, दैनंदिन आहारात वाढलेले जंक फुडचे प्रमाण, व्यायाम व आरोग्याबाबत उदासीनता अशा कारणांमुळे महिलांमध्ये सर्वाइकल कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. स्तनांच्या कॅन्सरनंतर महिलांमध्ये या कॅन्सरचे प्रमाण क्रमांक दोनवर आहे.

जानेवारी हा सर्वाइकल कॅन्सर प्रतिबंध महिना म्हणून पाळला जात असून त्याअनुषंगाने महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. (Risk of cervical cancer in women after breast cancer jalgaon news)

सर्वाइकल कॅन्सर म्हणजे सर्विक्स अवयवातील कॅन्सर. सर्विक्स म्हणजे गर्भपिशवी आणि योनीला जोडणाऱ्या अवयवात हा कॅन्सर होतो. ३५ ते ५५ वयाच्या स्त्रियांत प्रामुख्याने आढळून येतो.

ही आहेत कारणे

- एचपीव्ही व्हायरस इन्फेक्शन. हा विषाणू संबंधातून पसरतो.

- हार्मोन्सच्या असंतुलन- इस्ट्रोजन हार्मोन्स प्रमाण जास्त झाले किंवा progesteron हार्मोन कमी झाल्यास.

- अति स्थूलता, लठ्ठपणा.

- गर्भनिरोधक गोळ्यांचे दीर्घकाळ सेवन

- वंध्यत्व, संतती संख्या कमी

- वयाच्या ५५ वर्षानंतर स्त्रियांत रजोनिवृत्ती येते त्यांना धोका

- कमी वयात संबंध, अथवा अनेक व्यक्तींसोबत संबंध

- अनुवंशिकता- जर स्त्रीच्या आईला किंवा बहिणीला गर्भाशय मुखाचा कर्करोग असेल तर

- ब्रेस्ट कॅन्सर किंवा ओव्हेरियन कॅन्सर

अशी आहेत लक्षणे

- अस्वाभाविकरित्या रक्तस्त्राव

- संबंधानंतर रक्तस्त्राव होणे.

- रजोनिवृत्ती नंतरही रक्तस्त्राव होणे

- ओटी पोटात दुखणे, वजन कमी, भूक कमी होणे

- सतत दुर्गंधीयुक्त स्त्राव होणे.

या चाचण्या आवश्‍यक

- Pap smear test

- L.B.C (Liquid Based Cytology)

- HPV DNA

- Colposcopy.

काय करावे, काय करु नये

- वजन आटोक्यात ठेवणे यासाठी नियमित व्यायाम करावा

- चरबी युक्त पदार्थ तसेच जंक फूड यांचा अधिक आहारात समावेश टाळावा

- उच्च रक्तदाब मधुमेहासारखे विकार असल्यास त्यावर लगेच उपचार घ्यावा

- pap टेस्ट नियमित करणे गरजेचे. वयाच्या २१ ते ६५ वर्षामधील प्रत्येक स्त्रीने तीन वर्षातून एकदा तरी ही चाचणी करावी

- प्रतिबंधात्मक लसीकरण- जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार ९ ते ४५ वर्षापर्यंतच्या सर्व स्त्रिया ही लस घेऊ शकतात. ही लस ९ ते १४ वर्षापर्यंत घेतली तर या लसीचे दोनच डोस घ्यावे तर वयाच्या १५ वर्षानंतर घेतल्यास तीन डोस घ्यावे लागतात. पहिला शरीर संबंध होण्याच्या आधी जर ही लस घेतली तर ती अधिक प्रभावशाली ठरते.

"जानेवारी महिना हा सर्वाइकल कॅन्सर जागृती महिना म्हणून पाळण्यात येत आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या कुटुंबासह स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासंबंधी वरील माहिती लक्षात घेऊन योग्य काळजी घेतल्यास महिला व त्यांची पिढी कॅन्सरमुक्त होऊ शकेल."- डॉ. संपदा कुळकर्णी, स्त्रीरोग तज्ज्ञ, धुळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT