The road leading to Patel Wadi is in bad condition. esakal
जळगाव

Jalgaon News: रस्ता मंजूर तरीही कामास दिरंगाई; सार्वजनिक बांधकाम विभागाची मुजोरगिरी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील बहुतांश रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत. शिवाजीनगरातील लाकूडपेठ भागातील रस्ताही माजी आमदार चंदूलाल पटेल यांच्या निधीतून मंजूर आहे.

मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्याचे काम करण्यास दिरंगाई केली जात आहे. शिवाय माहिती सांगण्यासही अधिकारी मुजोरगिरी करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे नगरसेवक सार्वजनिक बांधकाम विभागाला सोडून महापालिकेची भुई धोपाटताना दिसत आहेत. (Road approved but work delayed Undertaking of Public Works Department Jalgaon News)

पटेल वाडीतील रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. या रस्त्यांवरून चालणेही कठीण झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

नागरिकांनी आंदोलन केल्याने महापालिकेच्या बाधंकाम विभागाकडून या रस्त्याची माहिती घेतली असता, पटेल वाडीतील रस्ता भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार चंदूलाल पटेल यांच्या निधीतून मंजूर झाला आहे.

त्याचे कामही सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. महापालिकेने या रस्त्याच्या कामासाठी ना-हरकत प्रमाणपत्रही दिले आहे.

जानेवारीत निविदा

रस्त्याच्या कामाबाबत अधिक माहिती घेतली असता, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या रस्त्याच्या निविदा जानेवारी महिन्यात काढल्या होत्या. त्यानुसार जळगाव येथील मक्तेदारास ते कामही दिल्याचे सांगण्यात आले.

मात्र, मक्तेदाराने रस्त्याच्या कामास सुरवात केलेली नाही. तब्बल सहा महिने झाल्यानंतर काम सुरू न करणाऱ्या मक्तेदारावर कारवाईबाबत मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गप्प आहेत.

जळगाव शहरात रस्त्यांच्या गंभीर समस्या आहेत. त्यासाठी आंदोलने होत आहे. रस्त्यांची कामे शासनाचा व आमदार निधीतूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिली आहेत. या विभागाकडून शहरातील रस्त्यांच्या कामाकडे लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे नागरिक अधिकाऱ्यांना विचारण्यास गेल्यावर अधिकाऱ्यांकडून मुजोरगिरी करीत असल्याचेही सागंण्यात आले. अधिकारी मक्तेदारावर कारवाई करीत नाहीत व नागरिकांनाही माहिती देत नाहीत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नगरसेवकांचा महासभेत संताप

शहरातील बहुतांश रस्त्याची कामे सार्वजनिक बांधकाम विभाग करण्यास तयार नाही. नगरसेवक काम होत नाही, म्हणून महापालिकेच्या महासभेत संताप व्यक्त करून महापालिकेची भुई धोपाटत आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र जाब विचारला जात नाही. त्यामुळे जळगावकरांना त्रास सहन करावा लागत आहे.

माजी आमदारांच्या घराकडील रस्ता

माजी चंदूलाल पटेल यांचे मूळ निवासस्थान पटेल वाडीत आहे. त्यामुळे त्यांच्या घराकडील हा रस्ता आहे. तरीही रस्ता करण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्याचे मक्तेदार विलंब करीत असतील, तर सर्वसामान्य जनतेचे काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

"शिवाजीनगर भागातील पटेल वाडीचे रस्ते आमदार निधीतून मंजूर आहेत. त्याचे कामही सार्वजनिक बांधकाम विभागास दिले आहे. महापालिकेने त्याच्या कामाला ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे." - चंद्रकात सोनगिरे, शहर अभियंता, महापालिका जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT