Potholes on Shivajinagar Bridge to Dudh Federation Road. 
जळगाव

Jalgaon News : दूध फेडरेशन ते रेल्वे स्टेशन रस्ता धोकादायक; डांबरीकरण की कॉंक्रिटीकरण वादात रखडले काम

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : दूध फेडरेशन ते रेल्वे स्टेशन रस्त्यावर आता मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे एखादे वाहन उलटून अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. हा रस्ता अत्यंत धोकदायक झालेला आहे. महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग दुरूस्ती करण्यास असमर्थ ठरल्याने आता अपघात रोखण्यासाठी तरी पोलीस प्रशासनाने या रस्त्यावरून अवजड वाहने बंद करण्याची गरज आहे.

दूध फेडरेशन ते रेल्वे स्टेशन हा रस्ता कामाच्या वादात अडकला आहे. अगोदर शासनाच्या ४२ कोटींच्या निधीतून रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बांधकाम विभागाने या रस्त्याच्या निवीदा काढून मक्तेदाराला डांबरीकरणाचे काम दिले होते. त्यानुसार मक्तेदाराने कामही सुरू केले होते. (road from Dudh Federation to railway station is dangerous jalgaon news)

त्यांचे डांबरीकरणाचे काम सुरू होते. डांबरीकरणाचा अंतीम लेअर बाकी असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने अचानक या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, आहे त्या परिस्थितीत डांबरीकरणाचे काम थांबविण्याचा आदेश देण्यात आला आणि मक्तेदाराने आपले काम थांबविले.

कॉंक्रिटीकरण निवीदेस मंजूरीची प्रतिक्षा

डांबरीकरणाचे काम थांबविले, त्यानंतर या रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाच्या निविदा काढण्यात आल्या. मक्तेदार नियुक्त करण्यात आले. त्यांना कामाचे आदेश देण्याबाबत फाईल मात्र अद्यापही प्रलंबीत आहे. आता त्याच्यावर स्वाक्षरी केंव्हा होणार व काम सुरू केंव्हा होणार याचीच प्रतिक्षा आहे.

रस्त्याला पडले मोठे खड्डे

डांबरीकरण झालेल्या या रस्त्याला कॉंक्रिटीकरणाच्या प्रतिक्षेत मोठमोठे खड्डे पडले आहेत. नव्याने बनत असलेल्या पिंप्राळा पुलाखाली मोठा खड्डा पडला आहे. पुढे तेल कारखान्याजवळही खड्डा पडला आहे. माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानाजवळील मारोती मंदिराजवळही खड्डा पडला आहे.

अपघात होण्याची शक्यता

रस्ता संपूर्ण खड्डेमयच आहे. डांबरीकरणाची संपूर्ण खडी वर आलेली आहे. तसेच, लहान खड्डे तर अनेक ठिकाणी पडले आहेत. या रस्त्यावरून जाणे म्हणजे कसरतच ठरत आहे. परंतु, आता या रस्त्यावर वाहनांना अपघात होण्याचीही शक्यता आहे. कारण या रस्त्यावरून रेल्वे मालधक्क्यावरून येणारी लोडेड वाहने ये-जा करीत असतात. या खड्ड्यात एखादे वाहन उलटे होण्याचीही शक्यता आहे.

तर जबाबदार महापालिका

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्त्याचे काम दिलेले आहे. मात्र, त्यांना काम देण्याबाबत महापालिकेनेच ना हरकत दिलेली आहे. शहरातील नागरिक महापालिकेकडे कर भरत आहेत. त्यामुळे नागरिकांसाठी रस्ते करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यामुळे जर या रस्त्यावर अपघात होवून हानी झाल्यास त्याला महापालिकाच जबाबदार असणार आहे. त्यामुळे महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवून स्वत: वेगळे होवू नये. आयुक्तांनी सार्वजनिक बांधकाम विभागास पत्र देवून या रस्त्याचे काम करावे. अन्यथा हा रस्ता आपल्या ताब्यात घेवून तातडीने त्याचे डांबरीकरणाचे काम करावे हाच आता अंतीम मार्ग आहे.

पोलीस प्रशासनाने सजग व्हावे

रेल्वे स्टेशन ते दूध फेडरेशन हा रस्ता अत्यंत धोकादायक झाला आहे. या रस्त्यावर केंव्हाही अपघात होण्याचा धोका आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनानेही सजग राहण्याची गरज आहे. या रस्यावरील अवजड वाहने तातडीने बंद करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT