road was cleared for traffic after Municipal Corporations strict action jalgaon news  esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : महापालिकेच्या दणक्यानंतर रस्ता झाला मोकळा

महापालिकेने,शहर वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने आजपासून धडक कारवाई सुरू केली

सकाळ वृत्तसेवा,

Jalgaon Municipality News : महापालिकेने,शहर वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने आजपासून धडक कारवाई सुरू केली आहे. शास्त्री टॉवर ते नेहरू चौक दरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे.

त्यामुळे हा रस्ता वाहतुकीला मोकळा झाल्याचे दिसून आले. (road was cleared for traffic after Municipal Corporations strict action jalgaon news)

शहरातील रस्त्यावरच बेशिस्त दुचाकी व चारचाकीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने महापालिकेने दुभाजकापासून बारा मीटर अंतरावर रस्त्यावर पांढऱ्या वीटा लावून हे पक्के मार्किंग केले. या मार्किंगच्या नियम मोडणाऱ्यावर कारवाई करताना आज संबंधित वाहनांची जप्ती सुरु करण्यात आली.

धडक कारवाई

महापालिकेने शास्त्री टॉवर ते नेहरू चौक रस्त्यावर वाहन पार्किंगचे मार्किंगच्या बाहेर वाहने लावू नये असे आदेश दिले. आदेशाचे उल्लघंन करणाऱ्यांत विक्रेत्याची गाडी असल्यास तीही जप्त करण्यात येणार आहे.

महापालिकेने पोलिसांच्या मदतीने धडक कारवाई सुरू केली. अतिक्रमण निर्मूलन पथकाने दुचाकी वाहने ट्रॅक्टरमध्ये टाकून जप्त केली आहेत. तर रस्त्यावर उभ्या असलेल्या चार चाकी वाहनांनाही वाहतूक पोलिसांतर्फे मेमो देण्यात आला आहे.

सकाळी अकराला सुरु झालेल्या कारवाईमुळे नागरिकांनी तसेच अतिक्रमणधारकांनी गाड्या मार्किंगच्या आत लावल्या होत्या.

शहरभर मोहीम

महापालिका शहरातील रस्त्यावर दुभाजकापासून १२ मीटर अंतरावर पार्किंगसाठी मार्कींग करणार असून त्याबाहेर लावलेली वाहन जप्त करणार आहे, रस्त्यावरील अतिक्रमित गाड्यांवरही कारवाई करणार आहे.

दरम्यान आजच्या कारवाईमुळे शास्त्री टॉवर ते नेहरू चौक रस्त्यावर टॉवरजवळ रस्त्यावर रिक्षा प्रवासी घेण्यासाठी उभे दिसणाऱ्या रिक्षा गायब होत्या, त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा दिसत होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT