Collector Ayush Prasad speaking at a meeting held on Tuesday to review the proposed road works in the city with a fund of 100 crores. 
जळगाव

Jalgaon News : शहरात एकाचवेळी 15 ठिकाणी 15‘टीम'द्वारे रस्त्यांची कामे; 100 कोटींच्या कामांचे कार्यादेश

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शंभर कोटींच्या निधीतून शहरात रस्त्यांची कामे सुरू होत असून वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, कामे रखडू नये म्हणून १५ ‘टीम'च्या माध्यमातून विविध १५ ठिकाणी एकाचवेळी कामे सुरू करण्यात येतील.

त्यामुळे ती वेळेत पूर्ण होऊन वाहतूक प्रभावित होणार नाही, असे नियोजन मंगळवारी (ता. ३१) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आले. ही कामे करताना महापालिका, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक पोलीस व महावितरण या विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवत काम करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी केली. (Road works by 15 teams at 15 locations simultaneously in city jalgaon news)

जळगाव शहरातील नवीन रस्त्यांच्या कामांचा व शहर वाहतूक नियोजनाचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, महापालिका शहर अभियंता सी. एस. सोनगीरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता जयंत चोपडे, उपअभियंता संजय राठोड, आर. एम. पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार आदी उपस्थित होते.

गौण खनिज वापराबाबत

शहरातील रस्ते तसेच इतर कामे करणाऱ्या ठेकेदारांनी अधिकृत रॉयल्टी भरणा केलेल्या गौण खनिजांचा वापर करावा. त्यांच्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आल्याची खात्री करण्यात यावी, अशा सूचना श्री.महाजन यांनी दिल्या.

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीतील सूचना

सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांची यादी तयार करावी

० कामे सुरू असलेल्या ठिकाणांची यादी वाहतूक शाखेला द्यावी

० एकाच वेळेस सर्व रस्ते बंद न करता, ‘क्रॉसिंग'च्या ठिकाणी लक्ष देण्यात यावे

० अमृत योजनेतील कामे निवडणुकीपूर्वी पूर्ण होतील याची काळजी महापालिकेने घ्यावी

० जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद पडणार नाही, यासाठी चारही फायबर ऑप्टिकल कंपन्यांना प्रस्तावित खोदकाम करण्यात येणाऱ्या रस्त्यांची यादी द्यावी

० महावितरणकडून पोल स्थलांतराचे काम वेळेत करण्यात यावे

फेब्रुवारीपर्यंत कामे करावीत

सरकारने जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी १०० कोटींचा निधी दिला आहे. त्या निधीतून शहरात लहान-मोठी अशी २६३ कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यासंबंधी कार्यादेश देण्यात आले असून कामे तातडीने सुरू करून वेळेत संपवावी, असे निर्देश ठेकेदार एजन्सीला देण्यात आले आहेत. फेब्रुवारीनंतर तापमान वाढत असल्याने कॉंक्रिटीकरणाच्या कामात समस्या निर्माण होतात. म्हणून फेब्रुवारी २०२४ अखेर ही कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT