roads and sewers in Bistiwada area of ​​Shahunagar work be completed request of citizen jalgaon  esakal
जळगाव

Jalgaon News : शाहूनगरातील भिस्तीवाडा भागातील रस्ते, गटारी कधी होणार; नागरिकांचा सवाल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील शाहूनगर परिसरातील भिस्तीवाडा भागातील फिरोज पान सेंटर ते साईव्हिजन रस्ता, तसेच याच भागातील गटारीचे काम गेल्या अनेक वर्षांपासून झालेले नाही.

हा रस्ता कधी होणार, असा प्रश्‍न या भागातील नागरिकांनी केला आहे. जर रस्त्याचे काम झाले नाही तर नेत्यांना रस्त्यावर फिरू देणारा नाही, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.(roads and sewers in Bistiwada area of ​​Shahunagar work be completed request of citizen jalgaon news)

या बाबत दिलेल्या निवेदनात नागरिकांनी म्हटले आहे, की शाहूनगरातील जुन्या पत्री मशीद भागातील भिस्तीवाडा भागातील मुख्य गटार बांधून द्यावी, तसेच रस्ता बांधून द्यावा, अशी मागणी गेल्या वीस वर्षांपासून करण्यात येत आहे.

मात्र या रस्त्याचे काम अद्यापही झालेले नाही. महापालिकेत अनेक वेळा तक्रारी करूनही नगरसेवक त्याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून आले आहे. तसेच यासाठी आंदोलनेही करण्यात आली आहेत. नगरसेवक हेतुपुरस्सर या भागातील रस्त्याचे काम करीत नसल्याचे दिसून येत आहे.

मात्र यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या रस्त्याचे व गटारीचे काम महापालिकेने त्वरित करावे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. जर या भागातील रस्त्याचे काम केले नाही तर नागरिक नेत्यांना व अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

या भागात पाहणी करीत असताना महापालिका आयुक्त व माजी नगरसेवक नितीन लढ्ढा यांना या भागातील नागरिकांनी समस्या सांगितल्या असता, त्यांनी समस्येबाबत काहीही उत्तर दिले नसल्याचेही नागरिकांनी पत्रकात म्हटले आहे. याकूब खान, अल्लाउद्दीन शेख, आसिफ बागवान आदींनी निवेदन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT