esakal
जळगाव

Jalgaon Crime : पत्त्यांच्या क्लबवर बंदुकधाऱ्यांकडून लूट

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : येथे अनधिकृतरित्या सुरू असलेल्या पत्त्यांच्या क्लबवर आठ ते दहा बंदूकधारी दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकल्याची घटना ११ मे रोजी घडली.

यात दरोडेखोरांनी सुमारे ५० हजारांची रोकड, सुमारे पन्नास हजारांचे सहा मोबाईल असा सुमारे लाखाच्यावर ऐवज लूटला. (Robbery by gunmen at card club jalgaon news)

एका स्थानिक तरुणाच्या मध्यस्थीने मोबाईल परत मिळाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, क्लबवरच ही लूट झाल्याने या घटनेची पोलिसात कोणीही तक्रार न दिल्याने कुठलीच नोंद आजपर्यंत झालेली नाही.

येथील बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावरील पेट्रोल पंपासमोरच्या हॉटेलात पत्त्यांचा क्लब सुरू असताना गुरुवारी (ता. ११) रात्री आठ ते नऊच्या सुमारास बऱ्हाणपूर येथील दहा ते बारा जण स्कूटी तसेच ॲपे रिक्षामधून आले. स्कुटीवरील तिघांच्या हातात बंदुका होत्या. त्या घेऊन ते थेट क्लबमध्ये घुसले व पत्ते खेळणाऱ्यांच्या कानफटावर बंदूक लावत लूट केली.

यावेळी ॲपे रिक्षातील तिघे, चौघे रावेर रस्त्यावर एका ठिकाणी उभे होते. दरोडेखोरांनी केलेली ही लूट क्लबमधील ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद झाली आहे. या घटनेत झालेल्या झटापटीत पत्ते खेळणाऱ्या एकाच्या पायाला दुखापत देखील झाल्याचे समजते. मात्र, याबाबतीत कोणीही तक्रार दिलेली नसल्याने सावदा पोलिसांना लुटीच्या या घटनेची कुठलीच माहिती नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मध्यप्रदेश राज्यातून थेट सावद्यापर्यंत तीन- तीन पोलिस ठाण्याच्या हद्दी ओलांडून दरोडेखोर असे दरोडे टाकत असल्याने त्यांना कायद्याची भीती उरली नसल्याचे दिसून येत आहे. काही पोलिस कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती आहे.

मात्र, स्वतःहून कोणी तक्रार देण्यासाठी पुढे न आल्यामुळे पोलिस देखील माहीत असूनही नसल्यासारखी भूमिका घेत आहेत. दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने दरोडेखोर उद्या सर्वसामान्यांच्या घरावर देखील दरोडे टाकायला मागे पुढे पाहणार नाही, अशी चर्चा होत आहे.

मोबाईल केले परत

बऱ्हाणपूरच्या दरोडेखोरांनी चोरून नेलेल्या सहा मोबाईलपैकी पाच मोबाईल सावदा येथील एका व्यक्तीजवळ परत केले. त्या व्यक्तीने क्लब मालकाला हे मोबाईल आणून दिल्याचे समजते. त्यामुळे ज्याने हे मोबाईल आणून दिले, त्याचा या दरोडेखोरांशी काही संबंध तर नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे.

विवरा गावातही लूट

सावदा येथे दरोडा टाकण्यापूर्वी याच लुटारूंनी निंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असाच अवैधरित्या सुरू असलेल्या क्लबवर देखील दरोडा टाकल्याची चर्चा आहे. या ठिकाणाहूनही दरोडेखोरांनी मोठा ऐवज लुटल्याचे बोलले जात आहे.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील सुरू असलेल्या अवैध धंद्यांविषयी विधानपरिषदेत आवाज उठवला होता. रावेर बाजार समितीच्या मेळाव्याप्रसंगी देखील आमदार खडसे यांनी याविषयी जाहिररित्या सांगितले होते. क्लबवरील लुटीच्या या घटनेमुळे तालुक्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दोन नंबरवाले तक्रार तरी कशी करणार?

अनधिकृतरित्या चालवले जाणारे पत्त्यांचे क्लब ज्यांचे आहेत, ते सर्व दोननंबरचे धंदे करतात. त्यांच्या क्लबवर बऱ्हाणपूरच्या दरोडेखोरांनी लूट केलेली असली तरी क्लबचे मालक या लुटीची तक्रार देऊ शकत नाही. क्लबमध्ये पत्ते खेळणारे देखील आपली बदनामी होईल म्हणून तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही.

पोलिसात तक्रार केल्यानंतर चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी क्लबमालक धजावत नसल्याने दरोडेखोरांचे फावत आहे. मात्र, अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता लक्षात घेता, पोलिसांनी दरोड्याच्या या घटनेची गुप्त चौकशी करुन परिसरात अवैधरित्या सुरु असलेल्या अशा सर्वच क्लबवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT