Inspirational News : अनेकांना एकवेळचे जेवण मिळणे कठीण असते. भुकेल्या पोटी झोपावे लागते. अशा भुकेल्यांच्या थाळीत जेवण, तेही पोटभर मिळावे; यासाठी रॉबिनहुड आर्मी समोर आली आहे.
'मिशन स्वदेश' ही मोहीम हाती घेत देशभरात या मोहिमेचा शुभारंभ करत आहे. साधारण १ हजार गावांमध्ये पोहचून एक कोटी लोकांपर्यंत धान्य व इतर गरजेच्या वस्तू रॉबिनहूड आर्मी पोचविणार आहे.
जळगाव जिल्ह्यात देखील गरजूंना धान्य दिले जाईल. (Robinhood Army will reach 1000 villages under their mission swades jalgaon news)
भारत स्वातंत्र्याचे ७६ वे वर्षे साजरे करत आहे. याचे औचित्य साधून रॉबिनहुड आर्मीचे स्वयंसेवक 'मिशन स्वदेश' हा उपक्रम घेऊन गरजुंना पौष्टिक अन्न वितरणासाठी सरसावले आहेत. देशातील सर्वात उपेक्षित लोकसंख्येला लक्ष्य करून त्यांच्या सहकार्याने नागरिकांना जेवण आणि रेशन वाटपासाठी प्रत्येक शहराच्या ५० किलो मीटरच्या परिघात २५ गावे दत्तक घेत आहेत.
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लाखो लोकांना प्रदान करण्यासाठी नागरिक, निर्माते, मीडिया हाउस आणि कॉर्पोरेट्स एकत्र येऊन खेड्यापाड्यांतील वंचितांना धान्य, गरजेच्या वस्तू पुरवतील. १५ सामाजिक प्रयत्नांतून हा उपक्रम राबविला जाणार आहे.
काही महिला स्वयंसेवकही प्रयत्नशील असून ग्रामीण, आदिवासी भागात लहान मुले उपाशी राहू नये यासाठी प्रयत्न केला जाईल. त्याच अंतर्गत गरजू कुटुंबास धान्य वितरीत केले जाणार आहे.
जळगाव जिल्ह्यात ३०० धान्य किट
रॉबिनहूड आर्मीकडून देशभरात हा उपक्रम राबविला जात आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात देखील हा उपक्रम १५ ऑगस्टला राबविला जाणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
याकरिता जिल्ह्यातील आसोदा (ता. जळगाव), मांदेवगिरी (ता. भुसावळ), मुगपाट (पद्मालय), म्हसावद, महादेव तांडा, जोगलखोरी या गावात जाऊन ३०० धान्य किटचे वाटप केले जाणार आहे.
उपक्रमात होता येणार सहभागी
ग्रामीण भागापर्यंत दीर्घकालीन अन्न, गरजेचे साहित्य, रेशनचा सतत पुरवठा, याची खात्री करण्यासाठी एकत्रित नेटवर्क काम करणार आहे. याकरिता दर महिन्याला शहरांमधून रॉबिनहुड आर्मीचे स्वयंसेवक कार्य करतील.
तसेच, या उपक्रमात सहभागी होऊन मदतीचा हात इच्छुकांना देता येणार आहे. याकरिता ८९७१९६६१६४ या व्हॉट्सॲप क्रमांकावर 'Hi' हा मेसेज पाठवून स्वयंसेवक म्हणून सामील होता येणार असल्याचे रॉबिनहूड आर्मीतर्फे कळविण्यात आले आहे.
"गावांचा सर्वांत मोठा हिस्सा भुकेने ग्रासलेला आहे. अशा भागात लक्ष केंद्रित करून ‘मिशन स्वदेश’ सोबतच्या दिशेने वाटचाल करण्यास आम्ही उत्सुक आहोत. तसेच, आम्ही आमच्या ग्रामीण भागातदेखील ही सेवा देत आहोत." -दर्शन जैन, ‘मिशन स्वदेश’चे नेते, रॉबिनहुड आर्मी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.