Roshan Kachwa  esakal
जळगाव

UPSC Exam : ‘यूपीएससी’त वरखेडेचा देशभरात डंका! रोशन कच्छवा 620 व्या रँकने उत्तीर्ण

दीपक कच्छवा :सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : स्पर्धा परीक्षा हे ध्येय नव्हतेच, परंतु मनातून इच्छा जागृत झाल्याने अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडून ‘यूपीएससी’ची वाट धरली अन् वेळेचे योग्य नियोजन करून जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर ‘यूपीएससी’ तून चौथ्या प्रयत्नात यश संपादन केले. (Roshan Kachwa secured 620 th rank across country in upsc examination jalgaon news)

वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील शेतकरी कुटुंबातील व आश्रमशाळा कर्मचाऱ्याचा मुलगा असलेल्या रोशन केवलसिंग कच्छवा या तरुणाने मंगळवारी (ता. २३) जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा २०२२ परीक्षेत देशभरातून ९३३ विद्यार्थ्यांमध्ये ६२० वी रँक मिळवून वरखेडे गावाचा डंका देशपातळीवर पोहोचवला आहे.

वरखेडे बुद्रूक येथील रोशन कच्छवा याचे वडील केवलसिंग कच्छवा हे सर्वोदय शिक्षण संस्थेच्या धामणगाव आश्रमशाळेत लिपिक आहेत. तर आई गृहिणी आहे. रोशन याचे पहिली ते तिसरीपर्यंतचे शिक्षण गुढे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. तर चौथी ते पाचवीपर्यंतचे शिक्षण पुण्यात झाले.

सहावी व दहावीपर्यंतचे शिक्षण चाळीसगाव येथील अभिनव विद्यालयात झाले. दहावीच्या परीक्षेत त्याला ९४ टक्के गुण मिळवले. अकरावीला जळगावच्या मू. जे. महाविद्यालयात प्रवेश घेतला. अकरावी व बारावी जळगाव येथे पूर्ण केल्यानंतर त्याने पुण्याला अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेतला. मात्र, त्या शिक्षणात मन रमले नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडून नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात ‘बीए’साठी प्रवेश घेतला. तेथे बीए पूर्ण केल्यानंतर सरळ ‘यूपीएससी’ला गवसणी घालण्याचा निर्धार केला.

आजोबांचे स्वप्न पूर्ण

रोशनचे आजोबा (कै.) जयसिंग दोधू पाटील यांनी रोशन लहान असताना आपला नातू यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण व्हावे, असे स्वप्न पाहिले होते. आजोबांचे हे स्वप्न रोशनने अखेर पूर्ण केले. यूपीएससीचा अभ्यास त्याने एकाग्रता व झपाटून केला. त्यासाठी स्पर्धा परीक्षेचे क्लासेस देखील लावले. पहिल्या प्रयत्नात तो पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाला.

मात्र अंतिम परीक्षेने यशापासून हुलकावणी दिली. त्यामुळे रोशन नाऊमेद झाला नाही. दुसऱ्या, तिसऱ्या प्रयत्नातही अपयश आले. अखेर तो पुन्हा झपाटून अभ्यासाला लागला आणि चौथ्या प्रयत्नात त्याने यश संपादन केले. या यशासाठी त्याला आई -वडील, भाऊ तसेच काका विक्रमसिंग कच्छवा यांचे मार्गदर्शन लाभले.

'स्पर्धा परीक्षेसाठी मला घरातून आई, वडिलांसह कुटुंबातील सर्व सदस्यांनी प्रोत्साहन दिले. अनेकदा माझ्या वडिलांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन देखील केले. लहानपणापासूनच मला माझ्या आजोबांचे स्वप्न पूर्ण करायचे होते. ते पूर्ण झाल्याचे समाधान आहे." - रोशन कच्छवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: चंदगड मतदारसंघात शिवाजी पाटीलआघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT