Girish Mahajan News : जिल्ह्यातील कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी, मका उत्पादक शेतकऱ्यांना पीकविम्याच्या शासन निर्णयानुसार प्रतिकूल हवामान परिस्थितीच्या निकषांनुसार २५ टक्के नुकसानभरपाईची रक्कम अग्रिम स्वरूपात अदा करण्याच्या सूचना ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत. (Rural Development Minister Mahajan statament Pay 25 percent compensation to farmers jalgaon)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
जळगाव जिल्ह्यात मागील २५ ते ३० दिवसांपासून पावसाचा खंड पडलेला असून, खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटलेली असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
राज्य सरकारच्या सर्वसमावेशक पीकविमा योजनेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील चार लाख ५४ हजार २७७ शेतकऱ्यांनी एक रुपया भरून आपल्या पिकाचा पीकविमा काढलेला आहे.
या विम्याच्या निकषानुसार हंगामातील प्रतिकूल हवामान परिस्थिती उद्भवली आहे. याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तत्काळ अधिसूचना निर्गमित करून संबंधित विमा कंपनीकडून पीकविमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसानभरपाईची रक्कम अग्रिम स्वरूपात अदा करण्यात यावी,
जिल्ह्यातील पावसाचा अहवाल संकलित करून जळगाव जिल्ह्यातील बहुतांश महसूल मंडळांमध्ये सलग २१ दिवस पावसाचा खंड पडल्याने (२.५५ मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडल्याने) संबंधित महसूल मंडळातील शेतकरी झालेल्या नुकसानीची भरपाईस पात्र असून,
तत्काळ संबंधित विमा कंपनीस याबाबत २५ टक्के अग्रिम स्वरूपात नुकसानभरपाई देण्याच्या जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींनीना सूचना दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.