A temporary arrangement erected for the residence of saints. esakal
जळगाव

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत तीर्थक्षेत्र पूरम संतांचा मुक्काम

राम मंदिर सोहळ्यासाठी येणाऱ्या संत व त्यांच्या शिष्यांसाठी तीर्थक्षेत्र पूरम येथे व्यवस्था केली असून, तेथे एकूण सहा भाग करण्यात आले

श्रीकांत जोशी

Jalgaon News : राम मंदिर सोहळ्यासाठी येणाऱ्या संत व त्यांच्या शिष्यांसाठी तीर्थक्षेत्र पूरम येथे व्यवस्था केली असून, तेथे एकूण सहा भाग करण्यात आले आहेत. प्रत्येक भागात एक लंगर असून, ठिकठिकाणी २४ तास चहा व टोस्ट दिला जात आहे.

तर थंडीपासून संरक्षणासाठी रस्त्यावर छत्रीसारखे ‘हीटर’ लावण्यात आले आहेत, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस परीक्षित बऱ्हाटे यांनी दिली. तीन दिवसांपासून ते अयोध्येत मुक्कामी आहेत. (Saints stay at Tirtha Kshetra Pooram for Ram Mandir celebrations in Ayodhya jalgaon news)

थेट अयोध्येतून ‘सकाळ’शी बोलताना बऱ्हाटे म्हणाले, की मी व भाजपचे शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे असे दोघे जनार्दन महाराज यांच्याबरोबर आलो आहोत.

त्यांचे शिष्यही आहेत. गुजरातमधील मुख्य केंद्रातून ५० शिष्य आले आहेत. सर्व संत व शिष्य यांच्या मुक्कामासाठी मुख्य मंदिरापासून चार किलोमीटरवर तीर्थक्षेत्र पूरम वसविण्यात आले. तेथे पत्र्याच्या खोल्या तयार करण्यात आल्या आहेत.

यातच संत राहतात. येथे एकूण चार भाग असून, त्यांना महंत अवेद्दनाथजी महाराजनगर, महंत अभिरामदासनगर, मोरोपंत पिंगळेनगर, ओंकार भावेनगर अशी नावे दिली आहेत. प्रत्येक भागासाठी एक लंगर आहे. शिवाय, प्रत्येक ठिकाणी चहा व टोस्ट दिले जातात.

थंडीचा कडाका वाढला असल्याने रस्त्यावर काही ठिकाणी छत्रीसारखे ‘हीटर’ बसविण्यात आले आहेत. त्या छत्रीखालून गेल्यावर गरम वाटते.

आम्ही बुधवारी (ता. १७) मंदिर ट्रस्टच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली. कार्यालयाच्या समोरच भारतातील विविध नद्यांचे जल मोठमोठ्या स्टीलच्या कलशात आणून ठेवले आहे.

"हनुमान गढीवर तसेच जुन्या मंदिरात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. नवीन मंदिर दुरून पाहता आले. अनेक ठिकाणी अजूनही कामे सुरू आहेत. अजून म्हणावी तशी गर्दी जाणवत नाही. जळगाव जिल्ह्यातून भक्तिकिशोर शास्त्री, संत गोपालचैतन्य बापू यांचे आगमन झाले आहे. वातावरण एकदम प्रसन्न व उत्साहपूर्ण आहे." - परीक्षित बऱ्हाटे, जिल्हा सरचिटणीस, भाजप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT