Garbage project esakal
जळगाव

Sakal Impact : घनकचरा प्रकल्पाच्या विधी शाखेचा अहवाल प्राप्त; महासभेत ठेवणार प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या घनकचरा प्रकल्पाच्या वादाबाबत विधी शाखेचा अहवाल प्राप्त झाला आहे.

आता महासभेत अहवालासह प्रस्ताव ठेवण्यात येणार असून, त्यावर नगरसेवक काय निर्णय घेणार, यावरच या रखडलेल्या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे.

जळगाव शहरात रोज साधरणत: तीनशे टन कचरा जमा होतो. सद्यःस्थितीत हा कचरा महापालिकेच्या डंपिंग ग्राउंडवर आव्हाणी भागात जमा करण्यात येत आहे. (Sakal Impact Legal Branch report received on solid waste project proposal will be put in General Assembly Jalgaon News)

या कचऱ्याची विल्हेवाट लावून त्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी शासनाने घनकचरा प्रकल्प उभारणीसाठी जळगाव महापालिकेला निधीही मंजूर केला आहे. मात्र, मक्तेदार व महापालिका यांच्या वादात चार वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे.

महापालिका प्रशासनातर्फे छत्रपती संभाजीनगर येथील मक्तेदार लक्ष्मी कन्ट्रक्शनला काम देण्याबाबत प्रस्ताव दिला होता. त्यास बहुमताने मंजुरी दिली होती. मात्र, भाजप नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी त्यास विरोध केला.

त्यानंतर हा प्रस्ताव रखडला. महासभेतही त्यावर चर्चा होऊन विधी शाखेकडून त्याबाबत अहवाल मागविला होता. मात्र, तीन महिन्यांपासून या शाखेनेही अहवाल दिला नव्हता. त्यामुळे या प्रकल्पाबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली होती.

सकाळ ’चा पाठपुरावा

‘घनकचरा प्रकल्पाचा तिढा सोडविणार कोण?’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ने शनिवारी (ता. २०) वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यात विधी शाखेतर्फे अहवालास दिरंगाई होत असल्याचेही म्हटले होते. त्या वृत्ताची दखल घेऊन विधी शाखेनेही महापालिका प्रशासनास अहवाल दिला आहे.

अखेर अहवाल प्राप्त

विधी शाखेतर्फे तब्बल तीन महिन्यांनंतर या प्रकल्पाचा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र, शासन आदेश व जीवन प्राधिकरणाकडून आलेल्या प्रस्तावानुसार या प्रकल्पाच्या मक्त्याला मंजुरी द्यावी, असा कल असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे शासनातर्फे मक्त्याची किंमत वाढविण्यास मंजुरी नाकारण्यात आली, तसेच जीवन प्राधिकरणानेही तसाच अहवाल दिला असल्याने विधी शाखेच्या अहवालाप्रमाणे जुन्या मक्तेदाराला काम न देता नवीन निविदा काढण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगण्यात येत आहे. आता हा निर्णय महासभेलाच घ्यावा लागणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महासभेत प्रस्ताव

विधी शाखेने दिलेला प्रस्ताव महासभेत ठेवण्यात येणार आहे. बुधवारी (ता. ३०) किंवा गुरुवारी (ता. ३१) महासभा होण्याची शक्यता आहे.

त्यात हा अहवाल ठेवण्यात येईल. त्यावर सविस्तर चर्चा होऊन नगरसेवक याबाबत काय निर्णय घेतील, त्यावर या प्रकल्पाला चालणार मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT