Children playing in the garden and Children enjoying boating in the lake.  esakal
जळगाव

Sakal NIE Camp : निसर्गाच्या सान्निध्यात खेळ, बोटिंगची मज्जाच मज्जा!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : निसर्गरम्य परिसर... हिरवळीचे रम्य वातावरण... खेळायला बगीचा, त्यातले खूप सारे खेळ... बोटिंगची मज्जा... गोमातेचे वात्सल्य, अशा नैसर्गिक वातावरणात ‘सकाळ-एनआयई’ आयोजित शिबिरातील मुलांनी शुक्रवारी (ता. २८) धम्माल मस्ती केली. नंदग्राम गोधामाच्या सहलीचा मुलांनी मनसोक्त आनंद लुटला आणि या पाचदिवसीय मस्तीचा जल्लोषात समारोप झाला. (Sakal NIE camp children had lot of fun on 28 april jalgaon news)

शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात वेगवेगळ्या उपक्रमांमधून महत्त्वपूर्ण योगदान देण्याचा प्रयत्न ‘सकाळ- एनआयई’तर्फे सातत्याने केला जातो. त्याचाच भाग म्हणून श्री चैतन्य हॉस्पिटलसह हॉटेल सुलक्स, नंदग्राम गोधाम, भारतीय जैन संघटना यांच्या सहकार्यातून ‘एनआयई’च्या पाचदिवसीय उन्हाळी शिबिराचा शुक्रवारी समारोप झाला. समारोपाच्या दिवशी मुलांची नंदग्राम गोधाम (अंजाळे गावाजवळ) येथे सहल नेण्यात आली.

बच्चे कंपनीची धमाल

शिबिरात पाच दिवस विविध ॲक्टिव्हीटी, कलागुणांचे धडे घेतल्यानंतर शुक्रवारी मुलांनी नंदग्राम येथे मस्ती केली. तत्पूर्वी सकाळी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बसमधून मुले नंदग्रामपर्यंत पोचली. त्याठिकाणी झोके, घसरगुंडी, पकडापकडीच्या खेळांत मुले चांगलीच रमली.

विविध साहसी खेळही विद्यार्थी खेळले. छोट्या तलावात मुलांनी नौकाविहाराचा आनंद घेतला. नंदग्राममधील गायींची माहिती जाणून घेतली. सकाळी नऊपासून दुपारी बारापर्यंत मुलांनी सहलीच्या ठिकाणी मनसोक्त आनंद लुटला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

शिबिरात सहभागी झाल्याबद्दल प्रत्येक विद्यार्थ्यास ‘सकाळ-एनआयई’ व श्री चैतन्य हॉस्पिटलतर्फे सहभाग प्रमाणपत्र नंदग्राम गोधामचे संचालक अभिलाष नागला व पंडित रवी ओम शर्मा यांच्या हस्ते देण्यात आले. अष्टांग योग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रा. अविनाश कुमावत, हिरालाल महाजन, डॉ. गोपाळ पाटील, सुरेश पाटील यांचे सहलीसाठी सहकार्य लाभले. शिबिराचे नियोजन एनआयई समन्वयिका हर्षदा नाईक-भट यांनी केले. त्यांना सोनाली साळी, नेहा सपकाळे यांनी सहकार्य केले. पालकांनी या वैशिष्ट्यपूर्ण शिबिराबद्दल ‘सकाळ’चे आभार मानले.

"सकाळ-एनआयईच्या शिबिरात पाच दिवस आम्ही खूप मौजमस्ती केली. नृत्य प्रशिक्षण, क्राफ्टच्या वस्तू, टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करण्यासह जापनीज भाषेबद्दलही उपयुक्त माहिती जाणून घेतली. शेवटच्या दिवशी सहलीचा आम्ही मनमुराद आनंद लुटला. -आर्यन राहुल पाटील, शिबिरार्थी

"सकाळ-एनआयईचे शिबिर आमच्यासाठी वेगळा अनुभव देणारे ठरले. धमाल मस्तीसह या शिबिरात आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. रंगीबेरंगी पाणी बॉटल्स, आकर्षक गॉगल्स या भेटवस्तूही आम्हाला मिळाल्या. सहलीत आम्ही खूप मज्जा केली." -अनुष्का दिलीप कुलकर्णी, शिबिरार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT