Sakal Ganesha Workshop : चिमुकल्या हातांनी गणपती साकारताना त्यांची कलात्मकता दिसून येते. स्वतः मूर्ती साकारताना व ती पूर्णत्वाला आल्यानंतर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद काही वेगळाच असतो.
अशा कलांना वाव देण्यासाठी ‘सकाळ’ नेहमी पुढाकार घेते. त्याचाच भाग म्हणून रविवारी (ता. १०) शाडूपासून गणपती बनविण्याबाबत कार्यशाळा होणार आहे. (sakal NIE Sunday workshop by Rotary Midtown on ganesha idol making jalgaon news)
‘सकाळ एनआयई’ उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी रविवारी सकाळी साडेनऊला ओजस्विनी कला महाविद्यालय (एम. जे. कॉलेज) परिसर येथे कार्यशाळा होणार आहे. शाडूपासून गणेशमूर्ती तयार करून तिची प्रतिष्ठापना करण्याची संधी या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
‘एनआयई’च्या सभासदांसाठी कार्यशाळा मोफत आहे. सभासद नसलेल्यांसाठी सशुल्क आकारले जाणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. कार्यशाळेसाठी रोटरी क्लब ऑफ मिडटाउन यांनी प्रायोजकत्व दिले आहे. रोटरी क्लब ऑफ मिडटाउनचे अध्यक्ष आर. एन. कुलकर्णी, मानद सचिव ॲड. किशोर पाटील, कार्यक्रम समितीप्रमुख शंकरलाल पटेल, उपाध्यक्षा छाया पाटील, ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मिलन भामरे यांचे सहकार्य मिळत आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी कार्यशाळा मोलाची ठरणार आहे. ‘सकाळ एनआयई’च्या माध्यमातून वाचनकौशल्य, लेखनकौशल्य, संवादकौशल्य वाढीच्या प्रयत्नांसह वैविध्यपूर्ण माध्यमातून विविध विषयांचा संवाद साधला जातो. विद्यार्थ्यांना त्यांचे विचार मांडण्यासाठी प्रवृत्त केले जाते. वर्षभरात खास अंक प्रकाशित केले जातात.
कार्यशाळेदरम्यान वार्षिक सभासद नोंदणी उपलब्ध असेल. नावनोंदणीसाठी हर्षदा नाईक भट (८२७५५८८७९१) यांच्याशी संपर्क साधावा.
कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना शाडू आयोजकांकडून दिली जाईल. विद्यार्थ्यांनी घरून येताना पुठ्ठा, पाट, नॅपकिन, बाउल, कंपासपेटी, ब्रश सोबत आणणे आवश्यक आहे. कार्यशाळेसाठी ओजस्विनी कला महाविद्यालयातील प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.