अमळनेर (जि. जळगाव) : झारखंड राज्यातील सम्मेद शिखरजी हे सकल जैन समाजाचे सर्वांत मोठे तीर्थक्षेत्र असून, जैन धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. केंद्र शासनाने या स्थळाला पर्यटनक्षेत्र म्हणून घोषित करण्याऐवजी तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावे, या मागणीसाठी येथील सकल जैन समाजातर्फे मूकमोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या वेळी बाजारपेठेत कडकडीत बंद देखील पाळण्यात आला. (Sammed Shikharji Pilgrimage case Amalnera strictly closed by Jain community Jalgaon News)
निवेदनात म्हटले आहे, की सम्मेद शिखरजी (झारखंड), तसेच शत्रूंजय तीर्थ पालिताना व गिरनार तीर्थ (गुजरात) ही ठिकाणे सकल जैन समाजाची श्रद्धास्थान आहेत. मात्र झारखंड सरकारने या क्षेत्राला पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्याने तेथील पावित्र्य धोक्यात येऊ शकते, जैनधर्मीय या तीर्थक्षेत्रावर मोठ्या भक्तिभावाने दर्शनाला येत असतात. तरी शासनाने जैनधर्मियांच्या भावनांचा आदर करत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, यासाठी मूकमोर्चा काढण्यात आला.
या वेळी सुभाष चौकातून मोर्चाला सुरवात करण्यात आली. पुढे स्टेट बँक, भागवत रोड, बसस्थानक मार्गे मोर्चा तहसील कार्यालयात आला. या वेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात समाजातील ज्येष्ठ, तरुण तसेच महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
या वेळी आचार्य भगवंत श्री जीनमणी प्रभूसुरीश्वरजी, श्री सूर्यप्रभाश्रीजी, श्री मधुरीमाश्रीजी तसेच मोर्चात शीतलनाथ जैन संघाचे अध्यक्ष महेंद्रलाल कोठारी, स्थानकवासी जैन संघाचे अध्यक्ष दीपचंद खिंवसरा, दादावाडी जैन संघाचे अध्यक्ष संजय गोलेच्छा, ओसवाल जैन संघाचे अध्यक्ष घेवरचंद कोठारी, गिरुवाजी पार्श्वनाथ जैन संघाचे अध्यक्ष डॉ. किशोर शहा, दिगंबर जैन संघाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र जैन, भारतीय जैन संघटना खानदेश विभागाचे अध्यक्ष विनोद खिंवसरा, शिरसाळे दिगंबर जैन संघाचे अध्यक्ष उपेंद्र जैन, खा. शि. मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, अर्बन बँकेचे संचालक प्रवीण जैन, प्रकाश शहा, मदनलाल ओस्तवाल, अशोकचंद डागा, भिकचंद छाजेड, अशोक छाजेड, सुभाषचंद्र लोढा, प्रकाशचंद पारख, प्रसन्नचंद्र बाफना, तिलोकचंद गोलेच्छा, रोनक संकलेचा, विपूल मुणोत, महावीर पहाडे, जितेंद्र जैन, बजरंगलाल अग्रवाल, योगेश मुंदडा, प्रदीप अग्रवाल, शिरसाळा जैन संघाचे पदाधिकारी योगेश जैन, महेश जैन, अमित जैन, श्रेणीक शहा, वीरेंद्र जैन, मोहन जैन तसेच सकल जैन समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.