sand mafia Dumper caught fine on a different numberplate sakal
जळगाव

वाळूमाफियांची अशीही बनवाबनवी..!|डंपर पकडले एक दंड वेगळ्याच नंबरप्लेटवर

धक्कादायक; मोठा मासा वाचवण्याचा प्रयत्न येणार अंगलट

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात वाळूमाफिया ठरवतील तीच पूर्वदिशा झालेली आहे. वाळूच्या बेसुमार पैशांपुढे राजकीय नेत्यांचीही पाचावर धारण बसते. असाच एक किस्सा बोदवड तहसील कार्यालय क्षेत्रात घडला आहे. जळगावहून चोरीची वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले गेले. मात्र, पकडलेले डंपर वेगळे आणि वेगळ्याच डंपरच्या नंबरप्लेट वरुन कारवाई करण्यात आली आहे. घडल्या प्रकाराचे बिंग फुटल्यावर महसूल खात्यात एकच खळबळ उडली आहे.

जळगावहून वाळूची चोरटी वाहतूक करणारे वाळू डंपर बोदवड तहसील कार्यालयाने मंगळवारी (ता.१८) अडवले. तपासणी केल्यावर त्यात तीन ब्रास चोरीच्या वाळूची बेकायदा वाळू वाहतूक होताना आढळून आली. तहसीलदारांनी हे वाहन ताब्यात घेतले. मात्र, डंपर चालक-मालकाने महसूलच्याच आशीर्वादाने पकडलेल्या डंपरची नंबरप्लेट बदल करून वेगळाच नंबर वाहनावर लावला. त्या नंबरच्या वाहनाला दंडही आकारण्यात आला. वाहन सोडून देणार इतक्यात या प्रकरणाचे बिंग फुटले.

राजकीय ‘तपास’चक्रे

राजकीय तपासचक्रे गतिमान होऊन थेट पेालिस ठाणे आणि आरटीओ कार्यालयास याची दखल घ्यावी लागली. तहसील कार्यालयाने पकडलेल्या व दंड आकारला जाणाऱ्या डंपरवर (एमएच १९ वाय ४४६४) असा नंबर होता. तोच नंबर तहसीलच्या कारवाईतील दस्तऐवजावर आला. मात्र आरटीओ अधिकाऱ्यांनी वाहनाच्या चेचिस नंबर, इंजिन नंबरवरून शोध घेतल्यावर तोच डंपर (एमएच १९ एम ३६३६) या नंबरचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकाराबाबत मात्र उलटसुलट चर्चेसह तालुक्यातील राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे.

जळगावहून लागली ‘लाइन’

बोदवड तहसील कार्यालयाने वाळूडंपर पकडल्यावर महसूलचे मुख्यालय असलेल्या जळगावातून सूत्रे हलली. मोठ्या माणसाचे डंपर पकडे गेल्याने महसुलच्या एका कर्मचाऱ्याने वायुवेगाने बोदवड गाठून पकडलेले डंपर कालबाह्य झाल्याने त्याची नंबरप्लेट बदलून वेगळाच क्रमांक लावून कारवाई करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा महसूल विभागात आहे.

अशी आहे बनवाबनवी..!

पकडले गेलेले डंपर (एमएच १९ झेड ३६३६) हे साधारण १३ वर्षे तीन महिने जुने असून, (१८ ऑक्टोबर २००८ ला) नोंदणी होऊन त्याचे फिटनेस २७ ऑक्टोबर-२०२१ पर्यंतच होते. विमा १३ फेब्रुवारी २०२१ पर्यंत तर त्याचे टॅक्स ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वैध हाते. तसेच पीयूसी ५ मे २०२१ला संपली आहे. कारवाई झालेले डंपर (एमएच १९ वाय ४४६४) साधारण आठ वर्षे जुने आहे, फिटनेस २२ ऑक्टोबर २२ पर्यंत विमा आणि टॅक्स फेब्रुवारी २१ पर्यंत, पीयूसी एप्रिल २१ पर्यंत तर परमिट जून २२पर्यंत आहे.

''वाहन पकडले, त्यावर जी नंबरप्लेट होती त्यावर महसूल नियमानुसार दोन लाख ६२ हजारांचा दंड आकारला गेला आहे. नंबरप्लेट आणि गाडी मालक शोधण्याचे काम आरटीओ कार्यालयाचे असल्याने आरटीओ अधिकाऱ्यांनी वाहनाचे परीक्षण करून चेसिस नंबरवरून हे वाहन (एमएच १९ झेड ३६३६) असल्याचे निष्पन्न झाले असून, पुढील कारवाई आरटीओ विभागांतर्गत होणार आहे.''

- योगेश्‍वर टोंपे, तहसीलदार, बोदवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Manoj Kayande Won Sindkhed Raja Election 2024 final result live : 'सिंदखेड राजा'त मनोज कायंदे ठरले 'राजा'? शिंगणेंचा पराभव

Raj Thackeray reaction : अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच...! निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी

Amgaon Assembly Election Results 2024 : आमगाव मतदारसंघात भाजपने गड राखला! संजय पुरम 110123 बहुमताने विजयी

Samadhan Awatade won Pandharpur Assembly Election: आघाडीमध्ये बिघाडी!समाधान आवताडे यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघामधून सलग दुसऱ्यांदा मारली बाजी

SCROLL FOR NEXT