जळगाव

Jalgaon Crime News : प्रांतांच्या घरी जात वाळूमाफियांकडून धमकी; भूषण सपकाळेची मुजोरी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : प्रांताधिकारी महेश सुधाळकर यांच्या शासकीय निवासस्थानी धडकत हद्दपार गुन्हेगार भूषण रघुनाथ सपकाळे (वय ३२, रा. खेडी) याने धमकावल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

हद्दपारीच्या प्रस्तावास न्यायदंडाधिकारी म्हणून प्रांताधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्याने भूषणने थेट फोन करीत घरी धडकून विचारणा केल्याने खळबळ उडाली. दरम्यान, रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रांताधिकारी सुधाळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी (ता. २२) निवडणूक केंद्राची पाहणी करीत असताना हद्दपार भूषण सपकाळे याने मोबाईलवरून संपर्क साधला. भूषणने थेट आपल्याला हद्दपार का केले, अशी विचारणा करून भीती घालण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी सुधाळकर यांनी उद्या कार्यालयात येऊन आदेशाची प्रत घेऊन जा, असे सांगत फोन कट केला. ( sand mafia threatened provincial officer jalgaon crime news)

यावर भूषण सपकाळे याचे समाधान न झाल्याने तो, त्याच्या एका साथीदारासह शुक्रवारी रात्री प्रांताधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानावर धडकला. प्रवेशद्वारावरील शिपायासोबत हमरीतुमरी करीत ‘तुझा साहेब कुठे आहे?’ असा प्रश्न करीत गोंधळ निर्माण केला.

सुधाळकर सामोरे येताच भूषण सपकाळेने चित्रपटातील भाईप्रमाणे केलेल्या कारवाईबाबत जाब विचारून धमकावले. त्यानंतर परत जाताना ‘दरवाजा उघडा ठेव, पुन्हा येतो’ अशा शब्दांत शिपायाला दरडावत पाय आपटत तो निघून गेला. नंतर जिल्‍हाधिकारी, पोलिस अधीक्षकांशी आपसात चर्चा होऊन उपअधीक्षक संदीप गावित यांच्या पथकाने भूषणला बेड्या ठोकत धुळे कारागृहात रवाना केले.

कायद्याचा वचकच राहिला नाही...

रात्री-अपरात्री कुटुंबातील पत्नी-मुलांदेखत कुणाच्याही घरावर गोंधळ घातला, तर संपूर्ण कुटुंबात भीती निर्माण होणे साहजिक आहे. आजवर पोलिस कर्मचाऱ्यांची कॉलर पकडली तरी संबंधित राजकीय पदाधिकारी असो की गुन्हेगार, त्याला जनतेसमक्ष सोलून काढले जात होते. वर गुन्हाही दाखल होत होता.

मात्र, गेल्या काही वर्षांत महसूल आणि पोलिसांच्या भागीदारीत गावगुंड वाळूचा धंदा करीत असल्याने त्यांना प्रशासन-पोलिस असो की कायदा याची भीतीच राहिली नाही. लॉकडाउनमध्ये वाळूमाफियांबरोबरच्या मद्य पार्ट्या, अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर वाळूमाफियांची सरबराई अन्‌ डोक्यावर राजकीय वरदहस्त यातून अवैध धंदा करणाऱ्यांच्या मनातून कायद्याची भीतीच निघून गेल्यासारखी स्थिती आहे.

अशा प्रकारांमुळे आजवर अधिकारी-कर्मचारी दडपणात असायचे. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीती दाखविण्याचा प्रकार सुरू झाला आहे. याची प्रशासनाने वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.

‘शूटआउट...’ स्टाइल धमकी

मुंबई गुन्हेगारी विश्वात वर्ष १९९१ मध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारावर आधारित ‘शूटआउट ॲट लोखंडवाला’ हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित होऊन खूप गाजला. सत्यघटनेवर आधारित असल्याने हिट झालेल्या या चित्रपटात मुंबई अंडरवर्ल्डला संपविण्यासाठी तत्कालीन पोलिस दलाने भूमिगत गुन्हेगारांना बाहेर काढण्यासाठी व गुन्हेगारी टोळ्यांच्या म्होरक्यांना घाबरविण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांवर दबाव आणला होता.

मात्र, याचा विपरीत परिणाम होऊन या गुन्हेगारांनी तेव्हा पोलिस अधिकाऱ्यांनाच त्यांच्या कुटुंबीयांदेखत धमकावण्यास सुरवात केली. तसाच काहीसा प्रकार जळगाव वाळूमाफियांच्या बाबतीत घडत आहे.

राजकीय अभय अन दबावतंत्र?

तत्कालीन जिल्‍हाधिकारी अमन मित्तल यांच्यावर वाळूमाफियांशी सलगी असल्याचे आरोप झाल्याने त्यांची बदली होऊन त्यांच्या जागी जिल्‍हाधिकारी आयुष प्रसाद यांची नियुक्ती झाली.

इकडे पोलिस दलात नव्यानेच अधीक्षक म्हणून एम. राजकुमार यांनी धुरा सांभाळली. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी मिळून वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई, हद्दपारी आणि स्थानबद्धतेचे अस्त्र उगारले आहे.

दोघांनी डझनावर गुन्हेगार वर्षभरासाठी वेगवेगळ्या जेलमध्ये स्थानबद्ध केले. अडीच हजारांवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. सहा महिन्यांपूर्वी याच प्रांताधिकाऱ्यांकडे हद्दपारीचे १०५ प्रस्ताव प्रलंबित होते. मात्र, त्यापैकी एक-दोन हद्दपाऱ्या तेव्हा झाल्या. उर्वरित तसेच पडून राहिले.

गणेशोत्सव आणि आगामी २०२४ च्या निवडणूक तयारीसाठी कारवाई बंधनकारक असल्याने हद्दपारीला गती आली आहे. आता राजकीय आश्रयाला असलेल्या गुन्हेगारांनीही स्वतःसाठी चौकशी सुरू केली आहे. वेगवेगळ्या साहेबांचे स्वीय सहाय्यक हद्दपारी थांबविण्यासाठी सक्रिय झाल्याचेही बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Row: तिरुपती मंदिरात तूप पुरवणाऱ्या एआर डेअरीचा मालक कोण? काय करते कंपनी?

Actor Accident: 'माय नेम इज खान' फेम अभिनेत्याचा मोठा अपघात; आयसीयूमध्ये आहे परवीन डबास, प्रकृती गंभीर

Marathi New Movie : हिटलरच्या भूमिकेसाठी इतके अर्जदार ! ही आहे परेश मोकाशींच्या मुक्काम पोस्ट बोंबीलवाडीची भन्नाट कास्ट

Latest Marathi News Updates : आदित्य ठाकरे यांची पत्रकार परीषद दुपारी २:२० मिनटांनी मातोश्रीवर होणार

VBA First List: वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर!

SCROLL FOR NEXT